Maharashtra

आरोग्याचा मुलमंत्र वाढवा वजन झटपट

आरोग्याचा मुलमंत्र

वाढवा वजन झटपट

आजच्या काळात वजन वाढणे खूप सर्वसाधारण समस्या आहे, परंतु काही लोकांच्या बाबतीत आपल्याला याच्या उलट पाहावयास ‍मिळते म्हणजे वजन वाढतच नाही किंवा शरीरांची पाहिजे तेवढी सर्वांगिन वाढ होत नाही. अनेक जण वजन न वाढल्याने त्रस्त असतात. कितीही खाल्ल तरी अंगी लागत नाही, वजन वाढतच नाही अशी अनेकांची समस्या असते. कमी वजन असल्याचा किंवा अति बारिक असलयाचे अनेक दुष्परिणाम शरीरावर दिसून येतात. त्यामुळे अनेक जण वजन वाढत नसल्यानेही चिंतेत असतात.

हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे वजन वाढणे, वजन कमी असणे ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललीये. तुमचेही वजन कमी असल्यास ते वाढवण्यासाठी हे आहेत काही उपाय

१) खजूर आणि दूध
खजूर खल्ल्यानेही वजन वाढण्यास मदत होते. रोज रात्री दूधात भिजत ठेवून ते खजूर सकाळी खाल्याने व दूध पियाल्यानेही वजन वाढवण्यास मदत होतो. हा प्रयोग तुम्ही कमीत कमी २ महीने सलग न चुकता केल्यास तुम्हाला तुमच्या वजनात आमुलार्ग बदल झालेला दिसेल.

२) मनुका
मनुका रात्री पाण्यात टाकून भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर त्याचे सेवन करा. मनुका हा फँटस ला हेल्दी कॅलरीजमध्ये बदलतो ज्यामुळे तुमचे वजन वाढते. मनुकासोबतच तुम्ही आक्रोड व बदाम देखील नियमित पणे खाऊ शकता. सतत दोन महिने जरी तुम्ही हा प्रयोग केल्यास तुम्हाला तुमचे वजन वाढल्याचे नक्की जाणवेल.

३) केळ
केळ हा एक प्रकारे संपूर्ण आहार मानला जातो.केळयात असणारे कॅलरीज व कार्बोहायड्रेट वजन वाढवण्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे दररोज किमान दोन केळी खालयाने लवकरच तुम्हाला फरक जाणवेल.

४) बटाटा
वजन वाढवण्यासाठी बटाटयाचा तुमच्या जेवणात सहभाग असणे गरजेचे आहे. बटाटामध्ये कार्बेहाइड्रेटस असते जे की तुमचे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर बटाटा खाल्लाच पाहिजे. शक्यतो उकडलेला बटाटा खावा आणि तळलेला बटाटा खाणे टाळा. असे केल्याने तुम्हाला 2 महिन्यांमध्ये फरक दिसायला सुरवात होईल.

५) योग्य झोप
चांगल्या आरोग्यासाठी तसेच वजन वाढवायचे असल्यास पुरेशी झोप घेणे गरजेचे असते. दिवसांतून कमीत कमी आठ तासांची झोप आवश्यक असते.

६) व्यायाम महत्त्वाचा
आरोग्य उत्तम आणि निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम गरजेचा. वजन वाढवण्यासाठी नियमित व्यायाम करताना वजन उचलण्याचा व्यायाम करावा.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
{ होमिओपॅथी तज्ञ }

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button