India

आरोग्याचा मुलमंत्र..तोंडातील लाळे चे आरोग्यदायी फायदे

आरोग्याचा मुलमंत्र..तोंडातील लाळे चे आरोग्यदायी फायदे

आयुर्वेदातही लाळेचे अनेक फायदे सांगितले आहेत. सकाळची शिळी लाळ अधिक फायदेशीर सिद्ध होते.

त्वचेच्या समस्यांसाठी फायदेशीर: डाग, पिंपल्स दूर करण्यासाठी सकाळची शिळी लाळ फायदेशीर ठरते, मुरुमांची समस्या असल्यास शिळी लाळ चेहऱ्यावर लावल्याने ही समस्या दूर होते. सकाळची शिळी लाळ पिंपल्स किंवा जखमा बऱ्या झाल्यानंतर जे डाग राहतात ते घालवण्यासाठीही खूप उपयुक्त आहे.

डोळ्यांसाठी: जर तुमच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल असतील तर त्यावर शिळी लाळ लावल्याने खूप फायदा होतो. सकाळी तोंडाच्या लाळेने डोळ्याभोवती हळूवारपणे चोळा.

भाजल्यामुळे / चटका लागल्यामुळे त्वचेवर काळा डाग पडला असेल त्यांनी सकाळी लाळेने डाग पडलेल्या जागी मालिश करावी. यामुळे डाग हळूहळू फिका पडेल आणि त्वचेच्या रंगा सारखा सामान्य होईल.

खाज-खरुज झाली असेल त्यांनी दररोज लाळ सकाळी विना गुळणी करता इन्फेक्शन झालेल्या जागी लावावी बघता बघता त्वचा सामान्य होईल.

आता अत्यंत महत्वाचा उपाय कारण डायबिटीज झालेल्या लोकांना जर जखम झाली असेल तर ती बरी होत नाही हे तुम्हाला माहीत असेलच आणि जखम वाढल्यामुळे अनेक वेळा अवयव कापण्या पर्यत दुखणे वाढते हे तुम्हाला माहीत आहे त्यामुळे हा साधा आणि सोप्पा उपाय अनेक लोकांना अपंग होण्या पासून वाचवणारा होऊ शकतो. तर उपाय हा आहे की जर डायबिटीज झालेल्या व्यक्तीस जखम झाली असेल तर त्याने सकाळी उठल्यावर तोंडातील लाळ जखम झालेल्या जागी लावावी यामुळे घाव हळूहळू भरण्यास सुरुवात होते.

टायलीन नावाचे एंजाइम लाळेत असते जे आपल्या पचनशक्तीला वाढवते. पण मित्रांनो जर तुम्ही गुटखा, तंबाखू खाता आणि सारखे थुंकत असाल तर हळूहळू ही लाळ तयार होणे बंद होते आणि तोंडाचा कैन्सर होण्याची भीती वाढते.
म्हणून व्यसन करणे टाळा.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
( होमिओपॅथिक तज्ञ )

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button