Mumbai

आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षा होतील “ह्या” तारखेला..!

आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षा होतील “ह्या” तारखेला..!

मुंबई आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षेच्या तारखा ठरल्या असून वर्ग क पदासाठी 24 ऑक्टोबर तर वर्ग ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा होतील असं आरोग्य विभागाने सांगितले आहे. दि 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होनाऱ्या परीक्षा ह्या विविध कारणांमुळे रद्द करण्यात आल्या होत्या.ह्यात टेक्निकल प्रॉब्लेम प्रमाणेच वेळ आणि तारखा व0एकच होत्या यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार होते.ह्या पार्श्वभूमीवर अगदी परीक्षेच्या आदल्या रात्री उशिरा ह्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते.

आता मात्र सर्व परीक्षार्थींना 9 दिवस अगोदरच प्रवेशपत्र मिळणार आहे. रद्द झालेली परीक्षा होईल की नाही याबद्दल देखील शंका होती. राजेश टोपे यांनी मुंबईत आरोग्य विभागाची बैठक घेतली जाईल या बैठकीत या तारखा निश्चित केल्या जातील असे सांगितले होते. त्यानुसार 24 ऑक्टोबर तर वर्ग ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button