Nandgoan

शहरातील फळे-भाजी विक्रेते, व्यावसायिकांसह ७०० जणांची आरोग्य तपासणी

शहरातील फळे-भाजी विक्रेते, व्यावसायिकांसह ७०० जणांची आरोग्य तपासणी

आप्पा बिदरी

नांदगाव (नाशिक) –

भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स, श्री नेमीनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम, चांदवड व नांदगाव नगरपरिषद, नांदगाव यांच्यातर्फे संयुक्तपणे भाजीपाला व फळ विक्रेते, शहरातील किराणा दुकानदार, मेडिकल मालक आणि कामगार, मांस विक्रेते, दूध डेअरी चालकांची फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी केली. या माध्यमातून नांदगांव शहरातील सर्वांची आरोग्य तपासणी होणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचक्के यांनी सांगितले.

शहरातील फळे-भाजी विक्रेते, व्यावसायिकांसह ७०० जणांची आरोग्य तपासणी

येथील न्यू इंग्लिश स्कूल मैदानावर भाजीपाला व फळ विक्रेत्यांसाठी बाजार भरविण्यात येतो. भाजी विक्रेत्यांची याच ठिकाणी तर, शहरातील इतर व्यापारी व व्यवसायिकासाठी व्ही जे हायस्कूल याठिकाणी आरोग्य तपासणी करण्यात आली. भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स तसेच श्री नेमीनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम, चांदवड व नांदगाव नगरपरिषद नांदगाव यांच्यातर्फे भाजीपाला व फळविक्रेते मिळून २८८ विक्रेत्यांची यावेळी तपासणी करण्यात आली. त्यापैकी २५४ विक्रेत्यांना कोणतेही लक्षणे आढळून आले नाही. उर्वरित विक्रेत्यांना त्यांच्या जुने आजाराची लक्षणे आढळून आली. तर, ५५ वर्षांवरील विक्रेत्यांना कोरोनाविषयी माहिती देऊन घरी पाठविण्यात आले. या तपासणीत कोरोना चे लक्षणे निदर्शनास आली नसली तरी शुक्रवार ( दि.१५) ते शनिवार (दि.१६) दरम्यान येथील व्ही. जे. हायस्कूल मैदानावर शहरातील सर्व किराणा दुकानदार व दुकानातील काम करणारे कर्मचारी, सर्व मेडिकल स्टोअर्स, दूध डेअरी आणि मटन विक्रेते यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.
शहरातील सर्व व्यवसायिकांनी तपासणी करून नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचक्के यांनी केले असून यासाठी डॉ. नितीन जैन, नगरपरिषदेचे प्रशासकिय अधिकारी गुलाबराव नवले, वैभव चिंचोले, रोषणी मोरे, अनिल बुरकूल, बी.टी. घुगे, नारायण कोटमे, वाल्मिक गोसावी व उमेश चंडाले हे प्रयत्न करीत आहेत.
आतापर्यंत ७०० जणांची तपासणी !
शहरातील भाजी विक्रेते, मेडिकल व्यावसायिक, दूध डेअरी चालक यांच्यासह इतर व्यापारी मिळून जवळपास ७०० जणांची मेडिकल तपासणी करण्यात आली आहे. आणखी दोन दिवस हा उपक्रम सुरू राहणार आहे.

Leave a Reply

Back to top button