अडावद,चोपडा

“डेंग्यू प्रतिबंधासाठी” आरोग्य केंद्राकडून शर्तींचे प्रयत्न.. पण..? नागरिकांचा मात्र निष्काळजीपणा…

“डेंग्यू प्रतिबंधासाठी” आरोग्य केंद्राकडून शर्तींचे प्रयत्न.. पण..? नागरिकांचा मात्र निष्काळजीपणा…

गेल्या महिन्याभरापासून अडावद गावात डेंग्यू प्रतिबंध व त्यावर करावयाची उपाययोजने बाबत..

विजय देशमुख
चौका-चौकामध्ये ग्रामस्थांच्या गट सभा घेऊन तसेच गृहभेटीद्वारे देखील.. डेंग्यू बाबत जनजागृती करण्यात येत असुन डेंग्यूचा आजार आटोक्यात आणण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून अडावद आरोग्य केंद्राकडुन शर्तींचे प्रयत्न सुरू आहेत.
तरी देखील..
गावांतील ग्रामस्थ मात्र सुस्त पणे आरोग्य विभागाने केलेल्या जनजगरणाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे.

नेहमी प्रमाणे आज दिनांक-०२/११/२०१९ शनिवार रोजी देखील अडावद येथे आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचाऱ्यांच्या समूहाने घरोघरी गृहभेटीद्वारे दुषित डेंग्यू डासाच्या अळ्या असलेल्या भांड्यामध्ये,छतावरील फुलदाण्या, कुलर, फ्रिज मागील भांड्यामध्ये ऍबेट टाकण्यात यावे,
नागरिकांनी साठवुन ठेवलेल्या पाण्याच्या हौद/टाक्या/रांजण/कुलर इत्यादी भांड्यात आठवड्यातुन एकदा घासूनपुसून कोरडे करून दुसऱ्या दिवशी त्यात पाणी साठवुन सर्व भांड्याना कपड्याने घट्ट बांधून ठेवावे, जेणे करून अंडी घालण्यासाठी त्यात डासांचा प्रवेश होणार नाही.
असे परिसरातील सर्व नागरिकांना..आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विष्णुप्रसाद दायमा यांनी आवाहन वजा विनंती केली आहे.

डेंग्यू चा आजार अथवा कोणताही इतर साथीचा आजार असो.. मुख्यत्वेकरून मोठ्याप्रमाणात गावातील नागरिकांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय… आरोग्य विभाग असो वा कोणतीही शासकीय यंत्रणा हतबल ठरणार आहे.
त्याकरिता ग्रामस्थांनी स्वतःची अनास्था बदलविण्याची नितांत आवश्यकता असल्याचे दिसून येते. यामुळेच अश्या डेंग्यू किंवा इतर साथीच्या आजाराचा प्रसार होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

या सर्व सर्वेक्षण काळात वैद्यकीय अधिकारी डॉ.दायमा यांचे मार्गदर्शनाखाली…
आरोग्य सहाय्यक-पी.एस.लोखंडे,पी.ऐ. पारधी,आरोग्य सेवक-सुधीर चौधरी, विजय देशमुख, जगतराव पाटील, महेंद्र पाटील, दिनेश वाघ, आरोग्य सेविका-चंद्रकला चव्हाण,उज्वला परदेशी, सुनीता दुधे,आशा धनगर आदी आरोग्य कर्मचारी शर्तींचे परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Back to top button