Pandharpur

गोरगरीब जनतेसाठी लाईफलाईन हॉस्पिटल ने काढले आरोग्य कार्ड पत्रकारांच्या हस्ते केले आरोग्य पुस्तिकेचे प्रकाशन

गोरगरीब जनतेसाठी लाईफलाईन हॉस्पिटल ने काढले आरोग्य कार्ड पत्रकारांच्या हस्ते केले आरोग्य पुस्तिकेचे प्रकाशन

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर गेल्या वर्षभरापासून कोविड सुरू असल्याने लाॅकडाऊन मुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी बिघडलेली असताना नागरिकांना आरोग्याच्या उपचारासाठी मोठया खर्चाला सामोरे जावे लागते अशावेळी रुग्णांना उपचाराच्या आर्थिक खर्चात लाभ मिळावा या दृष्टीने पंढरपूर शहरातील सर्व सोयींनी युक्त असलेले सुपरस्पेशालिटी लाईफलाईन हॉस्पिटल मध्ये ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या ,गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला आरोग्य तपासणीमध्ये फायदा व्हावा यासाठी आरोग्य पुस्तिका काढली आहे. या आरोग्य पुस्तिकेचे प्रकाशन आज पंढरपुरातील ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र सरवदे, रविंद्र शेवडे व लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डाॅ. संजय देशमुख डॉ. सौ मंजुषा देशमुख तसेच या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले विशेष तज्ञ डॉक्टर यांच्या हस्ते करण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील सर्व सुविधांनी युक्त असलेले व सर्व प्रकारचे विशेष तज्ञ असलेले लाईफलाईन हे एकमेव हॉस्पिटल असून या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना बिलामध्ये सवलत मिळावी यासाठी आरोग्य पुस्तिकेच्या माध्यमातून रूग्णांना सर्व सुविधा मध्ये ५ ते २५ टक्के सवलत, डॉक्टर संजय देशमुख यांनी उपलब्ध करून दिली आहे. एका परिवारासाठी हेल्थ कार्ड म्हणून या पुस्तिकेचे वापर करण्यात येणार असून यामध्ये रुग्णांना तपासणी सह अत्यावश्यक असणाऱ्या रक्त लघवी तपासणी, सिटीस्कॅन तपासणी, एमआरआय तपासणी, तसेच गरज पडल्यास रुग्णाला उपचारासाठी दाखल केल्यानंतरही रुग्णाला पाच ते दहा टक्के पर्यंत ची सवलत मिळणार असून याचा लाभ रुग्णांना होणार आहे. सदर कार्डची वैद्यता ही दोन वर्षासाठी राहणार आहे. मोठे हॉस्पिटल म्हणजे महागडे हॉस्पिटल हा गैरसमज दूर करण्यासाठी व सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्यासाठी लाईफलाईन आरोग्य पत्रिका सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत आहोत. शासन मान्य बऱ्याच आजारावर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जातात जे आजार कोणत्याही योजनेत बसत नाहीत अशा सर्व आजारांवर हॉस्पिटलमधील तपासण्या व उपचारांवर ५ ते ३० टक्के पर्यंत सवलत दिली जाते. ही सवलत या पुस्तिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न असून सर्वसामान्य व गरजू रुग्णांना मोफत तसेच सवलतीच्या दरात उपचार देण्यासाठी या आरोग्य पत्रिकेचा फायदा होणार असल्याचे डॉक्टर संजय देशमुख यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील सर्व सुविधांनी युक्त असलेले व सर्व प्रकारची विशेष तज्ञ असलेले एकमेव हॉस्पिटल असून या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना बिलामध्ये सवलत मिळावी यासाठी आरोग्य पुस्तिका उपलब्ध करून दिली आहे. एका परिवारासाठी हेल्थ कार्ड म्हणून या पुस्तिकेचे वापर करण्यात येणार असून यामध्ये रुग्णांना तपासणी सह अत्यावश्यक असणाऱ्या रक्त लघवी तपासणी सिटीस्कॅन तपासणी एमआरआय तपासणी तसेच, या ठिकाणी ९७२ आजारांवर उपचारासाठी लाईफ लाईन हॉस्पिटलला मान्यता आहे. गरज पडल्यास रुग्णाला उपचारासाठी दाखल केल्यानंतरही पाच ते दहा टक्के पर्यंत ची सवलत मिळणार असून याचा लाभ रुग्णांना होणार आहे. सदरची पुस्तिकाही आरोग्य कार्ड म्हणून उपयोगात येणार असून प्रत्येक परिवारासाठी हे फायद्याचं असणार आहे कारण परिवारातील प्रत्येक व्यक्तीचे नाव व त्यांचे इतर माहिती या पुस्तिकेमध्ये दिली जाणार आहे. “लाईफलाईन फॅमिली कार्ड एक फायदे अनेक” यामुळे रुग्णांना इतर योजना सह या पुस्तिके मुळे उपचाराच्या खर्चात फायदा होणार असल्याचे डॉक्टर संजय देशमुख यांनी सांगितले सदर कार्यक्रम प्रसंगी लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष तज्ञ डॉक्टर प्रविण वायकुळे न्यूरो सर्जन, डॉक्टर कुलदीप कोलपाकवार
कार्डिओलॉजी, डॉक्टर सचिन बोटे यूरोलॉजी, डॉक्टर नीरज दोडके एमडी मेडिसिन ,डॉक्टर सो.प्रियंका दोडके त्वचारोग व कॉस्मेटाॅलॉजी तज्ञ, डॉक्टर सौ.भाग्यश्री वायकुळे बीपीएल, डॉक्टर अजिंय उकरंडे एम सी एच, डॉक्टर सोयब बक्षी अस्थिरोग तज्ञ यांची प्रमुख उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button