Amarawati

लालखडी परिसरात वंचित बहुजन आघाडी तर्फे आरोग्य कार्ड शिबिर..

लालखडी परिसरात वंचित बहुजन आघाडी तर्फे आरोग्य कार्ड शिबिर..

प्रशांत नेटके अमरावती

अमरावती : दि. 9/01/21 शनिवार पासून तीन दिवसीय आरोग्य कार्ड शिबिराचे आयोजन वंचित बहुजन आघाडी अमरावतीच्या वतीने लालखडी चौक अमरावती येथे केले आहे.
या शिबिराचे उद्घाटन डॉ. अलीम पटेल लेफ्टनंट कमांडर यांचे हस्ते सकाळी 10 वा. लालखडी चौक येथे होणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून अँड. सिद्धार्थ गायकवाड शहर अध्यक्ष, मुजीब भाई जिल्हा नेते, विद्याताई वानखडे महिला जिल्हा अध्यक्षा, प्रमीलताई प्रधान महिला अध्यक्षा, मीनाताई नागदिवे, वहिदा नायक ,सुनीताताई रामटेके राहणार आहेत. या आरोग्य कार्ड शिबिराचा लाभ जास्तीतजास्त नागरिकांनी घ्यावा तसेच वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सर्वस्वी *फूझेल सय्यद ,किरण गुड़धे, सिद्धार्थ दामोधरे, अनिल फूलझेले, मिलिंद दामोधरे, अंसार बेग, एजाज अली, डॉ. समीर खान, सुरेश तायडे, धीरज मेश्राम ईत्यादी कार्यकर्त्यानी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button