Maharashtra

आरोग्याचा मुलमंत्र पालक भाजी सेवनाचे आरोग्यास फायदे

आरोग्याचा मुलमंत्र

पालक भाजी सेवनाचे आरोग्यास फायदे

पालेभाज्यांमध्ये आवर्जुन खावी अशी भाजी म्हणजे पालक. पालक केवळ एक भाजीच नाही तर तिचे औषधी गुणधर्मही आहेत. त्यामुळे चला तर मग जाणून घेऊयात पालक खाण्याचे फायदे –

१. आरोग्य चांगले राखण्याच्या दृष्टीने शाकाहार करणाऱ्या व्यक्तींनी पालकाच्या भाजीचे नियमित सेवन करावे. कारण मटन, चिकन, अंडी, मासे, यांच्या मासांतून जेवढय़ा प्रमाणात प्रथिने मिळतात, अगदी तेवढय़ाच प्रमाणात पालकाच्या भाजीतून मिळतात.

२. पालकाच्या भाजीत लोह व तांब्याचा (कॉपर) अंश
रक्ताल्पता (अ‍ॅनिमया) या आजारावर ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे. पालक रक्त शुद्ध करतो व हांडाना मजबूत बनविण्याचे काम करतो.

३. पालकाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

४. अंगावर गाठ येऊन जर सूज आली असेल तर अशा वेळी पालकाच्या पानांचे पोटीस गरम करून त्याजागी बांधावे.

५. पालकामध्ये रक्तशोधक गुणधर्म असल्यामुळे यकृताचे विकार, कावीळ, पित्तविकार यामध्ये उपयुक्त आहे.

६. आतडय़ांची ताकद वाढविण्यासाठी व त्यांना क्रियाशील बनविण्यासाठी पालकाचा एक ग्लासभर अनुशापोटी नियमितपणे सेवन करावा याच्या सेवनाने आतडय़ांतील मलाचे निस्सारण होण्यास मदत होते व शौचास साफ होऊन पोट स्वच्छ राहते.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
{ होमिओपॅथी तज्ञ }

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button