Maharashtra

आरोग्याचा मुलमंत्र शरीरातील उष्णता कमी करा घरगुती उपयांनी

आरोग्याचा मुलमंत्र

शरीरातील उष्णता कमी करा घरगुती उपयांनी

अनेकांच्या अंगात उष्णतेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे अशा व्यक्तींना कोणत्याही ऋतुमध्ये उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. अनेक जणांना या काळात डोळ्यांची आग होणे, छातीत जळजळणे, अंगावर उष्णतेचे फोड येणं अशा तक्रारी जाणवतात. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्याचे काही घरगुती उपाय आहेत. हे उपाय कोणते ते घेऊयात.

१) मनुका :-
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मनुके हा सर्वोत्तम पर्याय आहे. दररोज राजी १०० ग्रॅम मनुका कोमट पाण्यात भिजवावे. सकाळी उठल्यावर या मनुका पाण्यासकट चावून खाव्यात.

२) जिरं :-
जिरे अत्यंत थंड आहेत. त्यामुळे रात्री एक कप पाण्यात अर्धा चमचा जिरं घालावेत. त्यानंतर सकाळी हे पाणी प्यावे. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. तसंच वजनदेखील नियंत्रणात येते.

३) सब्जा :-
सब्जा रात्री काचेच्या भांड्यामध्ये भिजत घालून सकाळी खडीसाखर घालून उपाशीपोटी घ्यावा.

४) ताक :-
ताकामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे दररोज दुपारी जेवण झाल्यावर ताक प्यावं. मात्र रात्रीच्या वेळी कधीही ताकाचं सेवन करु नये.

५) फळे :-
शक्यतो पाणीदार फळांचं सेवन करावं. यात कलिंगड, ताडगोळे, द्राक्ष, डाळींब या फळांचं सेवन करावं.

६) कोकम
नाईलाजाने आपल्याला स्पायसी फूड म्हणजे मसालेदार पदार्थ खावे लागतात आणि ते खाण्यात आल्यावर ती थोड्यावेळाने लगेच कोकम सरबत घ्यावे.

७) गुलकंद
शुद्ध गुलकंद नुसता किंवा दुधा सोबत सकाळी सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा.

८) एरंड तेल
रात्री झोपतांना तळपायाला एरंड तेलाने मालिश करावी. एरंड तेल थोड चिकट असते. म्हणून थोड्या प्रमाणात घेऊन मालिश करावी. शक्य झाल्यास झोपतांना डोक्याची मालिश सुद्धा एरंड तेलाने करावी.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
{ होमिओपॅथीक तज्ञ }

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button