Faijpur

आगामी निवडणुकींत कॉंग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार- प्रा.जी.पी.पाटील

आगामी निवडणुकींत कॉंग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार- प्रा.जी.पी.पाटील

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : येथील माजी उपनगराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व निवृत्त प्राचार्य प्रा.जी.पी.पाटील सर यांनी काही दिवसांपूर्वी लोकनेते स्व.बाळासाहेब चौधरी यांच्या कॉंग्रेसी विचारांना अनुसरून तसेच आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकुर यांच्या हस्ते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन कॉंग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर आज पहिल्यांदाच पत्रकार संस्था कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत प्रा.जी.पी.पाटील यांनी त्यांची भुमिका स्पष्ट केली आहे.
प्रा.पाटील पुढे म्हणाले की मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचा सदस्य होतो आणि पक्षाचे सर्व ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची विचारधारा सारखीच असून हे दोन्ही पक्ष अगोदर एकच होते आणि भविष्यात देखील एक होणार आहेत.माझी राष्ट्रवादी पक्षासंदर्भात कोणतीही तक्रार नाही किंवा मला तिथे कोणत्याही प्रकारचा त्रास वैगेरे नव्हता. मी स्वखुशीने कॉंग्रेस मध्ये प्रवेश घेतला असून यापुढे माननीय आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पुर्ण तन-मन-धनाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्य करणार असून आगामी निवडणुकीत कॉंग्रेसच्या जास्तीत जास्त उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे देखील यावेळी प्रा.जी.पी.पाटील यांनी सांगितले.
यावेळी पत्रकार परिषदेत कॉंग्रेस गटनेते कलीम खान मन्यार, नगरसेवक केतन किरंगे, कॉंग्रेस फैजपूर शहर अध्यक्ष शेख रियाज़, शेतकी संघ संचालक चंद्रशेखर चौधरी, युवक काँग्रेस शहराध्यक्ष वसीम तडवी, अनु.जाती जिल्हाध्यक्ष रामराव मोरे , कॉंग्रेस तालुका प्रसिद्धी प्रमुख गणेश गुरव सर, विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष वसीम जनाब, सरचिटणीस अजय मेढे इत्यादी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button