Faijpur

मुलगी पाहण्यासाठी आले अन् लग्न लावून गेले, भुसावळ मण्यार समाजाचा आदर्श विवाह

मुलगी पाहण्यासाठी आले अन् लग्न लावून गेले, भुसावळ मण्यार समाजाचा आदर्श विवाह

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : भुसावळ येथील लग्नाच्या रेशीमगाठी जुळवून आणण्यासाठी चालत आलेल्या पारंपारिक पद्धतींना फाटा देत मण्यार समाजाने सर्व सोपस्कार एकाच दिवशी पार पाडत समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.
सविस्तर वृत्त असे की भुसावळ येथील युसुफ रवान बिस्मिल्ला खान मन्यार यांची मुलगी सना बानो हिला पाहण्यासाठी दिनांक ४ /६ / २०२१ /शुक्रवार रोजी केवडी ता. उमरपाडा जि सुरत येथील कलीम रवान हाजी हसन रवान यांच मुलगा अलहज खान व काही मोजके नातेवाईक भुसावळ येथे मुलगी पाहण्यासाठी आले होते.मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दोन्ही परिवारातील प्रमुख मंडळींनी लागलीच उपवर मुलगी व मुलाला एकमेकांविषयी काय मत आहे याबद्दल जाणून घेतले असता दोघांनीही विवाहास संमती दर्शवल्याने परिवारातील प्रमुख सदस्यांनी कोणताही विलंब न करता मौलाना अब्दुल मजीद यांनी यांना बोलावून घेतले.मौलाना यांनी तत्काळ दोन्ही परिवारातील सदस्य व वधुवरांच्या संमतीने साखरपुडा तसेच लग्न (निकाह) लावून विवाहाचे सर्व विधी अत्यंत साध्या पद्धतीने व एकाच वेळी आटोपले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व वधु वरांकडील मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत एकाच दिवसात मुलगी पाहणे, साखरपुडा व लग्न इत्यादी सर्व विधी संपन्न झाल्याने सगळीकडे या अनोख्या पद्धतीने पार पडलेल्या लग्नाचीच चर्चा सुरू होती.आज सर्व विधी आटोपले यावेळी प्रमुख साक्षीदार वकील म्हणून भिकन
हाजी बिस्मिल्ला मन्यार (बेटावर) गवाह कलीम रवान हाजी हसन रवान (केवढी) सैय्यद सलीम सैय्यद रशीद (जलगाव) मध्यात हे होते.

याप्रसंगी भिकन रवान बिस्मिल्ला खान (नायब तहसीलदार बेटावद) कलीम रवान सैय्यद सलीम सैय्यद रशीद जलगाव हाजी रफिक सर चालीसगांव अनिस शेख शाहपूर शेख अ्बदुल्ल मजीद युसुफ रवान बिस्मिल्ला खान शाहरुख खान केवडी सैफ अली खान केवडी यांच्यासह मण्यार समाजातील प्रमुख मोजके मान्यवर उपस्थित होते या विशेष लग्ना ला हाजी साबीर शेख भुसावळ हाजी सलीम सेठ चुडीवाले सैय्यद फारुक अ.रउफभुसावल फारूख शेख पत्रकार फैजपूर यांनी अभिनंदन केले आहे अत्यंत साध्या पद्धतीने व एकाच दिवसात पार पडलेल्या विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा होत असुन मण्यार समाजाचे (बिरादरी चे) सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button