Chandwad

हरी ओम ग्रुपची अनोखी दीपावली राजधेरवाडीतील गोरगरिबांसोबत!!

हरी ओम ग्रुपची अनोखी दीपावली राजधेरवाडीतील गोरगरिबांसोबत!!
चांदवड उदय वायकोळे

चांदवड शहरातील एका तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्राध्यापक कार्यरत असलेले जी डी शिंदे सर हे नाव एखाद्या अनोख्या उपक्रमांसाठी परिचित आहे.14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी मातृ पितृ दिवस साजरा करून जेष्ठ नागरिक व जेष्ठ महिलांना भोजनाचा उपक्रम ते राबवितात, तसेच या वर्षी त्यांचा मनातील संकल्पनेनुसार त्यांच्या हरी ओम ग्रुपने कॉलनी परिसर व काही दुकानदार देतील ते नवे व जुने पण वापरण्यायोग्य कपडे,साड्या,लहान मुलांचे कपडे हरी ओम ग्रुप युवा सेवा संघ यांनी एक विशिष्ट फलक लावलेली गाडी ठिकठिकाणी फिरवून कपडे जमा केलेत.या गाडीवर सबका मंगल सबका भला अश्या प्रकारचे लिखाण असलेले फलक लावलेले होते.कपडे तसेच फरसाण ची पाकिटे एक पीक अप मध्ये भरून राजधेरवाडी या गावातील आदिवासी वस्ती व गोरगरीब जनतेस वाटप करण्यात आले.यावेळी लहान मुले व प्रौढ माणसे महिलावर्ग यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.यावेळी प्रा शिंदे यांच्यासह हरी ओम ग्रुपचे सदस्य व महिलावर्ग उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button