Aurangabad

खडक वाघलगाव येथे हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

खडक वाघलगाव येथे हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील खडक वाघलगाव येथे आज सकाळी सराला बेटाचे महंत ह.भ.प मंहत गुरूवर्य रामगिरीजी महाराज श्री क्षेत्र सराला बेट यांच्या हस्ते संकट मोचन हनुमान महाराज, विठ्ठल-रूखमाई, श्री गणेश व नागदेवतेच्या मुर्तींची प्राणप्रतिष्ठा या सोहळ्या निमित्ताने आज काल्याचे किर्तन झाले.

या काल्याच्या किर्तनात ह.भ.प रामगिरीजी महाराजांनी कंठी धरीला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश या अभंगावर कीर्तन करतांना सद्गुरु रामगिरीजी महाराजांनी केलेले विवेचन कंठा मध्ये कृष्ण नामाचा मनी धारण केला त्याने अज्ञान अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश पडला म्हणून कंठी धरीला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश. काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये काला वाटायचा आणि अनाधिकारी असेल तर त्याला वाकुल्या दाखवू आणि आधिकाऱ्याला उत्तम लोका दाखवू सेवा करणारे वीर तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे.

या कार्यक्रमास वैजापुर तालुक्याचे विद्यमान आमदार प्राचार्य. रमेश पा. बोरनारे सर, वैजापूरचे नगराध्यक्ष दिनेशभाऊ परदेशी, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष एकनाथराव जाधव, विश्वजीत चव्हाण, देवीदास धोत्रे, पोलीस पाटील पांडुरंग पाटील जगताप चंद्रकांत महाराज जाधव, मधुकर महाराज, दतु खपके तसेच असंख्य भाविक भक्तांनी या काल्याच्या किर्तनात हरिनामाचे श्रवण केले. तसेच काल्याच्या किर्तनाची सांगता झाली. यानंतर सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button