Erandol

?️ अत्याचारिला त्वरीत फाशी द्या.अन्यथा देश भरात तीव्र आंदोलन छेडले जाइल भिल समाज विकास मंच महाराष्ट्र जळगाव जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे यांच्या इशारा…

अत्याचारिला त्वरीत फाशी द्या.अन्यथा देश भरात तीव्र आंदोलन छेडले जाइल भिल समाज विकास मंच महाराष्ट्र जळगाव जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे यांच्या इशारा…

एरंडोल रजनीकांत पाटील

सारंगखेडा ता शहादा जि नंदुरबार येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुण तीच्या निर्घुन खुन करण्यात आले त्या संबंधित भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी एरंडोल यांच्या कडे निवेदन देण्यात आले दिनांक 23/10/2020 रोजी सारंगखेडा ता शहादा जि नंदुरबार येथील पहाटेच्या वेळी भुत बंगला परिसरात एक अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करुण तीच्या निर्घून हत्या करण्यात आली अत्याचार करणारा किशोर वडर यास पोलीस प्रशासनाने अवघ्या 4 तासात अटक करुण उल्लेखनीय कामगिरी केली आहे परंतु फास्ट ट्रक न्यायालयात या नराधमास त्वरीत फाशीची शिक्षा व्हावी व पिडीत स्वर्गवासी तरुणी व तिच्या कुटूंबाला न्याय मिळावा असे निवेदन मा उपविभागीय अधिकारी एरंडोल यांना देण्यात आले व निवेदनाची प्रत माहित्व सादर म्हणुन मा राज्यपाल महाराष्ट्र, मा मुख्यमंत्री सो महाराष्ट्र ,मा गृहमंत्री सो महाराष्ट्र, मा पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य, व मा पोलिस अधीक्षक सो जळगाव, यांच्या कडे करण्यात आले आहे या वेळी उपस्थित.. रामलाल दादा पवार (प्रदेश उपाध्यक्ष), दिपक अहिरे (जळगाव जिल्हाध्यक्ष) , संजय पवार सर( जेष्ठ सल्लागार) पंढरीनाथ मोरे (जेष्ठ समाज सेवक) सागर वाघ ( सोशल मिडीया जिल्हाप्रमुख जळगाव ) निहाल सोनवणे ( एरंडोल तालुकाध्यक्ष) विनोद मोरे बबलु सोनवणे आबा सोनवणे जितु बोडरे गणेश झांबरे किरण महाजन महेंद्र मालचे दिपू ठाकरे मधुकर सोनवणे समाधान सोनवणे यशवंत मोरे इच्छाराम सोनवणे विजय पवार दिपक ठाकरे दिपक महाले सागर बोरसे राहुल मोरे रितीक खोकरे आदी उपस्थित होते…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button