Ratnagiri

सारंगखेडा येथील अल्पवयीन आदिवासी मुलीची हत्या करणार्या आरोपीस फाशी द्या:बिरसा क्रांती दलाची मागणी

सारंगखेडा येथील अल्पवयीन आदिवासी मुलीची हत्या करणार्या आरोपीस फाशी द्या:बिरसा क्रांती दलाची मागणी

दिलीप आंबवणे

रत्नागिरी:सारंगखेडा येथील अल्पवयीन आदिवासी मुलीची हत्या करणार्यां आरोपीस फाशीची शिक्षा द्या,अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी मा.भगतसिंहकोश्यारी,महामहिम राज्यपाल,राजभवन, मलबार हिल वाळकेश्वर रोड,मुंबई , मा. उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई ,मा.उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा.अनिल देशमुख, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई ,मा. अँड.के. सी. पाडवी,आदिवासी विकास मंत्री, मंत्रालय मुंबई , पोलीस अधीक्षक नंदुरबार व पोलीस निरीक्षक शहादा यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, श्री. संतोष सोनवणे रा.भूतबंगला परिसर,सारंगखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांच्या मुलगीस किशोर वडार ह्या तरूणाने हत्या केली आहे.सदर घटना निंदनीय असून या घटनेचा सर्वप्रथम बिरसा क्रांती दल संघटना जाहीर निषेध करते.आदिवासी मुलगीने लग्नास नकार दिल्यामुळे तिची किशोर वडार यांनी हत्या केली आहे, असे समजते.सदर आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे. तरी आरोपाला फाशीसारखे कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. कारण असे अमानवीय कृत्य करणार्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. तरच असे आदिवासी मुलीवरील हत्याकांड प्रकार थांबतील.दिवसेंदिवस आदिवासी मुलींवर होणारे बलात्कार, हत्या यासारखे अत्याचार प्रकार वाढतच चालले आहेत. तेव्हा असे अमानुष कृत्य करणार्यां आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी.व आदिवासी मुलींवरील अत्याचार थांबविण्यात यावेत, न्याय देण्यात यावा. अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी शासनाकडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button