Pune

धनगर समाजाच्या मागण्यांकडे लक्ष दिले असते तर पंढरपूरचा निकाल वेगळा लागला असता -डॉ अर्चना पाटील

धनगर समाजाच्या मागण्यांकडे लक्ष दिले असते तर पंढरपूरचा निकाल वेगळा लागला असता -डॉ अर्चना पाटील
दत्ता पारेकर पुणे
पुणे : पंढरपूर विधानसभा मतदार संघाची निवडणूक अतिशय चुरशीची निवडणूक झाली. पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघाचा प्रचार मतदार संघातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना, पंढरपूर व मंगळवेढ्यातील ३५ गावांतील दुर्लक्षित राहिलेला पाण्याचा प्रश्न, तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनामध्ये झालेल्या अर्थसंकल्पामध्ये धनगर समाजासाठी अपेक्षित तरतूद केली नसल्यामुळे धनगर समाजामध्ये. तसेच बारामती मतदार संघामध्ये पडळकर यांचे डीपॉजिट जप्त झाले होते. ठीक आहे समाजाने आपल्यावर विश्वास दाखवला याचा अर्थ प्रचारसभांमध्ये वारंवार पक्षाच्या नेते मंत्री यांनी हा शब्द प्रयोग जाणीव पूर्वक केल्यामुळे व त्याचाही फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला बसला आहे असे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसते आहे.
तसेच या मतदार संघातील धनगर समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे परंतु सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर या मतदार संघाची जबाबदारी पक्षाने दिली होती परंतु त्यांचा संपर्क मतदार संघात कमी असल्यामुळे धनगर समाजाची मते खेचण्यात कमी पडले असेच या निकाला वरून स्पष्ट होत आहे, राज्यातील महविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर धनगर समाजावर अन्याय, मेंढपाळ बांधव यांच्यावरील अत्याचार वाढलेले आहेत. त्यामुळे समाजामध्ये नाराजीचे वातावरण आहे. पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघातील धनगर समाजाने निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे ताकत उभी केली होती. त्यामुळे भगीरथ नाना भालके यांना विजय मिळाला होता. यापुढील काळात तरी धनगर समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होऊ नये एवढीच अपेक्षा नाहीतर अशीच परिस्थिती धनगर बहुल मतदार संघात होऊ शकते.याचा विचार पक्षाने करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातारा जिल्हा महिला आघाडीच्या निरीक्षक व इंदापूर तालुक्यातील धनगर समाजाच्या नेत्या डॉ. अर्चना पाटील यांनी पक्ष श्रेष्ठींकडे केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button