Karnatak

हभप श्री भागवत महाराज याचे तुलाभार सोहळा संपन्न..

हभप श्री भागवत महाराज याचे तुलाभार सोहळा संपन्न..

प्रतिनिधी- महेश हुलसूरकर


हुलसुर : बोळेगाव येथील हभप श्री भागवत महाराज बोळेगावकर व त्याची पत्नी मथुराबाई भागवत महाराज याचे दोघांचेही साखरेचे तुलाभार श्री शिवाजीराव रामजी बिरादार यांच्या हस्ते करण्यात आली व त्यानंतर भागवत महाराज याचे नाण्यामध्ये तुलाभार अरविंद बिरादार, संतोष बिरादार, शिवाजी जाधव, शेषेराव कानोजी, ओम धबाले पाच जणांनी मिळुन तुलाभार केला हा कार्यक्रम अधिक मासाच्या निमित्त श्री गुरुचरित्र ग्रंथाची समाप्ती निमीत्य श्री विठ्ठल रुक्मिणी बोळेगाव मंदिरात श्री श्रीमंतराव बिरादार याच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बस्वराज बुळ्ळा बिदर, प्रभू बुळ्ळा बिदर, उद्योजक शिवाजीराव बिरादार पुणे, बाबुराव बिरादार आदी उपस्थित होते.
प्रथमतः गावातून महाराजांना पायघड्या घालून दिंडी मिरवणूक टाळ म्रुदंगाच्या गजरात केली ग्रामस्था सोबतच त्याचे संपूर्ण परिवार यावेळी उपस्थित होते.
आध्यात्मिक जीवन- मी तर पांडुरंगाचा या उक्तीप्रमाणे महाराजांचा जन्म मांजरा नदीच्या किनाऱ्यावर बोळेगाव या गावी झाला जनाबाईच्या उक्तीप्रमाणे ऐसा पुत्र देई संता तरी ज्या आवडे पंढरीनाथा असच काही महाराजांचा जीवन आहे इ.स.१९३३ साली आई नर्मदाबाई माणीकराव पाटील यांच्या पोटी जन्म झाला झंटीगराज पाटील हे त्यांचे मुळ नाव वयाच्या दहाव्या वर्षी आईने पंढरपूर दाखवली तेव्हापासून पंढरीची वारी सुरू झाली १२ व्या वर्षी घरीच वारी केली त्यानंतर १९५६ साली भक्तमंडळी सोबत वारी चालू होते इ.स. १९६१ साली जगतगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात महाराजांच्या दिंडीला ९ वा क्रमांक मिळाला रथाच्या पाठीमागे इ.स.२०११ मध्ये वारीला ५० वर्षे पूर्ण झाली महाराजांनी वयाच्या बाराव्या वर्षी चतुर्मास पुर्ण केले आध्यात्माचा अभ्यास कठोरपणे पाळत श्री रंगनाथ महाराज परभणीकर, भगवान शास्त्री धारुरकर व धुंडा महाराज देगलूरकर अशा थोर व्यक्तीच्या सान्निध्यात त्यांनी आपला अध्यात्मिक अभ्यास पुर्ण केला महाराजांनी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रात या तिन्ही राज्यात प्रवचन व किर्तन सोहळा केले आहेत तसेच बोळेगाव येथे ११ दिवस अखंड विना घेऊन सतत विठ्ठल नामाचा जप केला १९९१ साली हैदराबाद, आळंदी, पुणे, कोल्हापूर, येथे १२ तासात ज्ञानेश्वरीचे पारायण व्यासपीठ भोवती प्रदिक्षीणा घालून संपवीले महाराज आतापर्यंत ३ वेळेस नाण्यामध्ये तुलाभार करण्यात आला पंढरपूर येथे दोन वेळेस सौ.शांताबाई शिवाजीराव मुस्तापुरे यांनी केला व जामखंडी गावातर्फे एक वेळेस झाला महाराजांची सेवा ही अखंड सेवा सुरू आहे अखंड खंडेना भजन। रामकृष्ण नारायण। असच सतत सेवा ही गेली ६० ते ६५ वर्षे असीच सुरू आहे श्रीमत भागवत महापुराण वाचन १७ , ज्ञानेश्वरी ३१० , तुकाराम गाथा २५ , एकनाथी भागवत ५०, भगवत गीता ५०००, उपनिषद १, पुराणे १८ अशा अनेक ग्रंथाची वाचने झाली आहेत.
संसार गाथा- गुरुवर्य भागवत महाराज हे पाटील घराण्यातील आहेत याचा खूप मोठा परिवार आहे घर गोकुळवाडी येथे आहे याच्या घरचे मुळ पुरुष म्हणजे बापूदेव भागवत महाराज व लिंबाजीराव पाटील हे दोघे सख्खे भाऊ त्यांना पर्मार्थात सात दिली ते त्याचे बंधू लिंबाजीराव पाटलांनी संसार सांभाळत त्यात त्यांना रामराव तलवाडे, योगीराज तलवाडे, शिवाजीराव तलवाडे, चंद्रभान तलवाडे याची खूप मदत होती महाराजांचा आता परिवार आहे ९० मंडळीचा .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button