Khirdi

खिर्डीत छुप्या मार्गाने मिळतो गुटखा पोलिसांनी तथा एफडीएने नियमित कारवाई करावी.

खिर्डीत छुप्या मार्गाने मिळतो गुटखा पोलिसांनी तथा एफडीएने नियमित कारवाई करावी.
प्रवीण शेलोडे खिर्डी
खिर्डी : राज्यात २०१२ पासून गुटखाबंदी असतानाही ‘अन्न सुरक्षा मानदे कायदा’ पायदळी तुडवीत खिर्डीत अवैधरीत्या गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूची राजरोसपणे सर्रास विक्री पान टपरीधारक टपरी बंद असल्याने पानटपरी च्या शेजारी हातात पिशव्या घेऊन छुप्या मार्गाने व उघड्यावर गुटखा विक्री सुरू असल्याचे वास्तव सोमवारी ठोसप्रहार च्या प्रतिनिधीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पुढे आले आहे.
खिर्डीच्या प्रत्येक पानटपरीच्या शेजारी हातात पिशव्या घेऊन राजरोजसपणे गुटखा विकला जात असताना गुटखा विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासन विभागातील (एफडीए) अधिकाºयांचा आर्शीवाद तर नाही ना? असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडला आहे. लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये पानटपऱ्या बंद असल्या तरीही छुप्या मार्गाने खिर्डीत अवैध गुटखा विक्री सुरूच आहे. त्यामुळे तरुणाई व्यसनाधीन होत असून त्यांना कर्करोगासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.
अन्न व सुरक्षा मानदे कायदा २००६ विनियमन २०११ नुसार गुटखा विक्री करणे किंवा वितरण करणे गुन्हा ठरतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न व औषधी प्रशासन हा स्वतंत्र विभाग आहे. खिर्डी बुद्रुक मधील मराठी शाळेच्या परिसरात व बस स्टँड वरील पानटपऱ्या शेजारी हातात पिशव्या घेऊन उघड्यावर मोठ्या प्रमाणात विक्री करताना दिसतात, सदर प्रतिनिधीने स्टिंग ऑपरेशन करताना दोन वेगवेगळ्या कंपनीच्या ५० रुपयांच्या ५ गुटख्याच्या पुड्या विकत घेतल्या. त्या ठिकाणी अन्य ग्राहकांना सहजरीत्या गुटखा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे गर्दी पण दिसून आली . हा साठा कुठून येतो हा सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे.
अन्य जिल्ह्यातून येतोय गुटखा:-
गुटखा व सुगंधित तंबाखू अन्य जिल्ह्यातून खिर्डीत दाखल होतोय आणि तस्करांच्या माध्यमातून पानटपऱ्यांवर पोहोचतो. गावात लोकडाऊन असल्यामुळे घरातच गोळ्या बिस्किटे विकण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात गुटका पाकिटे पानटपरी वाले घेऊन जातात.खिर्डी बुद्रुक मधील मराठी शाळेच्या शेजारी त्यांना गुटखा मिळत असल्याचे सदर प्रतिनिधीला दिसून आले. गुटखा विक्रेत्यांवर एफडीएचे अधिकारी कारवाई करतातच पण पोलिसांनाही कारवाई करण्याचे अधिकार आहे.या गुटका तस्करावर कारवाई व्हावी अशी जन माणसाची मागणी आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button