दिंडोरी स्वामी समर्थ सेवा केंद्र अंतर्गत कृषी अभियान कार्यक्रमाचा गुरुमाऊलींच्या उपस्थित समारोप
सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी
ता. २८ :- श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वरच्या अंतर्गत काम करणाऱ्या कृषिशास्त्र विभाग व कृषी अभियानाच्या वतीने २४ जानेवारी रोजी कोरोना नियमांचे पालन करून एक दिवसीय कृषी जागर तर २५ ते २७ जानेवारी या कालावधीत विभागवार कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते याची सांगता आज झाली.
यंदाच्या च्या अकराव्या वर्षी पण महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, १० राज्य, तसेच ५ देशात दि. २४ जानेवारी रोजी कृषी जागर झाला, त्यास जोडून प्रत्येक विभागात विभागीय कृषी महोत्सवांचे आयोजन करण्यात आले, कोरोना पार्श्वभूमीवर या महोत्सवातील उपस्थिती मर्यादित ठेवण्यात आली होती, विषमुक्त शेती, गावरान बी-बियाणे, घरगुती खते-औषधे, जीवाणू कल्चर, शेतीपूरक जोड व्यवसाय, शेतकरी व बचत गट, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती, Krushi Mahotsav आणि Dindori Pranit Seva Marg ह्या युटूब चॅनेल वरून विविध तज्ञांचे मार्गदर्शन थेट पाहण्यास उपलब्ध होते. कृषी महोत्सवास जोडून शेतकरी कुटुंबातील विवाह इच्छुक मुला-मुलींची मोफत नोंदणी करून विनाहुंडा विवाहासाठी त्यांना प्रेरित करण्यात आले. तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी माऊली पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याच बरोबर रक्तदान शिबिर, शेतकर्यांसाठी शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले, देशी बि-बियाणे संवर्धन माहिती व मार्गदर्शन, कृषी महोत्सव व या यूट्यूब चैनलवर विविध विषयांचे तज्ञांची मार्गदर्शन, घरगुती खते औषधे बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले, विविध जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी व तज्ञ यांनी मार्गदर्शन केले, कृषी पर किर्तनाने सांगता समारोह पार पडला. शेती व शेतकऱ्यांना विविध योजना व तंत्रज्ञान माहीत व्हावे या साठी गेल्या दहा वर्षांपासून जागतिक कृषी महोत्सव सुरू असून या पुढेही तो असाच सुरू ठेवून शेती, शेतकरी व समाजाला विषमुक्त अन्न कसे देता येईल या दृष्टीने श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वरच्या अंतर्गत काम करणाऱ्या कृषिशास्त्र विभाग व कृषी अभियानाच्या वतीने हा उपक्रम राबविला जाईल असे समारोप प्रसंगी आबासाहेब मोरे यांनी सांगितले.