Nashik

जगाच्या कल्याणासाठी योग्य आहार विचार चांगले विचार आवश्यक गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे

जगाच्या कल्याणासाठी योग्य आहार विचार चांगले विचार आवश्यक

गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

दिंडोरी ता. २५ :- जगावर देशावर नव्हे मानव जातीवर येणार संकटे ही केवळ विषारी अन्न व बदलत चालणाऱ्या आचार विचारामुळे वाढत आहे याचे कोरोना हे एक उत्तम उदाहरण असून आपण आजही बदललो नाही तर भविष्यात या हुन ही मोठी संकटे येतील असे गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांनी जागतिक कृषीमोहोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी केले या वेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी तालुका कृषी अधिकारी विजय पाटील उपस्थित होते.
या वेळी गुरुमाऊली म्हणालो की, मोरेदादा चॅरिटेबल च्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे एक हजार बेड चे हॉस्पिटल ची उभारणी केली जाणार आहे या साठी लवकरच प्रारंभ करणार आहोत. या साठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे. माती पाणी बीज परीक्षण हे भविष्यकाळसाठी महत्वाचे आहे पारंपरिक शेती व गोधन कमी झाल्याने रासायनिक खते यांचे प्रमाण वाढल्याने असाध्य असे रोग वाढले आहे. द्वापार युगात स्वामींनी ‘भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे’ हे दिलेलं वाक्य आजही समाज्याची रक्षा करत आहे शेती व निसर्गाचे जवकचे ऋणानुबंध आहे. बळीराजा च्या आत्महत्या वाढत आहे या थांबल्या पाहिजे. आपल्या देशाती देशी गायी परदेशात दुधासाठी वापरल्या जात आहे व आपण का जर्षि वापरतो हे समजून घेतले पाहिजे. या साठी गावठी गाय पाळण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी आबासाहेब मोरे म्हणाले कि
केवळ मास व डोस घेऊन आजार जाणार नाही तर आरोग्य चांगले राखण्यासाठी विषमुक्त अन्न, चांगली हवा व जाण्याची जीवन पद्धतीत बदल केला पाहिजे. केवळ पैशाने आरोग्य सुधारणार नाही त्या साठी शेतीतून केवळ पीक पिकात नाही तर भावना देखील पिकात असतात अण्णा सात्त्विकता आणल्यास समाज्यात पण सात्त्विकता पेरली जाते केंद्रातुन सात्विक कृषीधन च्या माध्यमातून हे कार्य सुरू आहे. यावेळी मान्यवर व दिंडोरी नगरपंच्यातीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार करून शहराच्या विकासाठी मोठे योगदान देण्याचे आव्हान करत या साठी काही मदत लागल्यास स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून ही पुढाकार घेतला जाईल असेही नमूद केले.

या वेळी भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मीमन सावजी, तालुका कृषिअधिकारी विजय पाटील, जेस्ट नेते सुनील आव्हाड, प्रमोद देशमुख, अविनाश जाधव, माधवराव साळुंके आदींसह शेतकरी व भाविक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button