Rawer

नवे व कुशल नेतृत्व घडण्यासाठी सहकारातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन गरजेचे-आ.शिरीष चौधरी.

नवे व कुशल नेतृत्व घडण्यासाठी सहकारातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन गरजेचे-आ.शिरीष चौधरी.

स्व.गिरधरशेठ भंगाळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतींना उजाळा.

निंभोरा-संदिप को ळी
नव्या व कुशल नेतृत्वाला घडविण्यासाठी सहकारात काम केलेल्या ज्येष्ठांचे मार्गदर्शन गरजेचे असून तरुणांना संधी देतांना त्यांना योग्य मार्गदर्शन सहकारातील जाणत्या सहकाऱ्यांनी करावे असे प्रतिपादन निंभोरा येथील स्व गिरधरशेठ भंगाळे यांच्या १८व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आ.शिरीष चौधरी यांनी अध्यक्षस्थानावरून बोलतांना केले.
निंभोरा येथील सहकारमहर्षी स्व गिरधरशेठ भंगाळे यांच्या १८व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्याच्या स्मृतींना उजाळा म्हणून स्वानंद कृषी विज्ञान मंडळ व युवा रसिक मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन कृषीतंत्र विद्यालयात करण्यात आले होते.स्व गिरधरशेठ भंगाळे यांनी सांस्कृतिक मंडळ,फ्रुटसेल सोसायटी,नंदपाल दूध संस्था,उपसा जलसिंचन,पीक संरक्षण सोसायटी,पतसंस्था यांसह इतर संस्थांची स्थापना त्यांच्या काळात सुरू करून गावाला एक सहकारातील वटवृक्ष उभा करून दिला होता त्या अनुषंगाने दरवर्षी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळी कृषितंत्र विद्यालयाचे अध्यक्ष प्रल्हाद बोंडे,डॉ एस डी चौधरी यांनी ही मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमास प्रमाख पाहुणे म्हणून सरपंच सचिन महाले,माजी सरपंच डिगंबर चौधरी,कृषी विद्यालयाचे प्राचार्य एम टी बोंडे,स्वानंद कृषी मंडळाचे सचिव गुणवंत भंगाळे,विकास सोसायटीचे चेअरमन मोहन बोंडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती-
तर कार्यक्रमास नंदपाल दूध संस्थेचे चेअरमन सुधीर मोरे, स्वानंद कृषी चे अध्यक्ष गिरीष नेहेते,सांस्कृतिक मंडळाचे सचिव चंद्रकांत खाचणे,ग्रा पं सदस्य सतीश पाटील,मंदाकिनी ब-हाटे,रेखा कोळंबे,शेख दिलशाद,स्वप्नील गिरडे,मधुकर बिऱ्हाडे,धनराज राणे,दस्तगिर खाटीक,युनूस खान,सचिन चौधरी,प्रशांत पाटील,राजीव भोगे,प्रकाश खाचणे,वाय डी पाटील,संतोष वाणी,रवींद्र भोगे,रोशन बोंडे,राजीव बोरसे,युनूस खान,दत्तात्रय पवार,सुरेश चौधरी,विजय पवार, श्रीराम मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष अनिल ब-हाटे,विकी खाचणे,माधव ब-हाटे,कैलास बोरोले,कैलास भंगाळे,रवींद्र नेहेते,नितीन भंगाळे,मनोज सोनार,प्रकाश चौधरी,भालचंद्र कोळंबे,संजय महाजन, मुख्याध्यापक टिकाराम बोरोले,योगेश कोळंबे,सुपडू ब-हाटे,जितेंद्र भावसार,धनराज बावस्कर, जितेंद्र कोळंबे,किरण कोंडे,भूषण भंगाळे,छबिलदास ब-हाटे,वाल्मिक पवार,यांसह अन्य सहकारातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक बोंडे,प्रास्ताविक सुनील कोंडे यांनी तर आभार प्रदर्शन धीरज भंगाळे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button