Faijpur

पाडळसे प्रा.आ.केंद्रात महिला दिनानिमित्त नारीशक्ती च्या दिपाली चौधरी व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.कुंदन फेगडे यांचे मार्गदर्शन

पाडळसे प्रा.आ.केंद्रात महिला दिनानिमित्त नारीशक्ती च्या दिपाली चौधरी व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.कुंदन फेगडे यांचे मार्गदर्शन

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

फैजपूर प्रतिनिधी: ग्रामीण भागात प्रत्यक्ष रुग्णांशी संपर्क साधून आरोग्य विषयक जनजागृती करणाऱ्या आशा स्वयंसेवीकांच्या वतीने महिलांचा हक्काचा दिवस म्हणजे जागतिक महिला दिन पाडळसा प्राथमिक आरोग्य केंद्रात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ व नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ.दिपाली चौधरी आणि डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. कोरोना काळात महत्वपूर्ण कामगिरी बजावत सेवा दिल्यामुळेच आज आपण मोकळा श्वास घेऊ शकतो त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत असे प्रतिपादन यावेळी खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी केले.यावेळी डॉ.कुंदन फेगडे यांनीदेखील आरोग्यविषयक अनमोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी सर्व आशा कर्मचारी, महिला आरोग्य कर्मचारी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आशा गटप्रवर्तक सौ.निलिमा योगेश ढाके व आभार सौ.अर्चना विनोद सोनवणे यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button