Ausa

लामजना ,तपसे चिंचोली परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा साध्या पध्दतीनेच साजरा

लामजना ,तपसे चिंचोली परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा साध्या पध्दतीनेच साजरा

प्रशांत नेटके औसा

औसा : औसा तालुक्यातील लामजना ,तपसे चिंचोली ,परिसरात साध्या पध्दतीने
गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला .गुढी पाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक यादिवशी नवीन वस्तूची खरेदी करतात .

औसा तालुक्यातील लामजना ,तपसे चिंचोली मराठी नविन वर्षाचे स्वागत साध्या पद्धतीने आरोग्याच्या हिताची गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहुर्त समजला जात असल्यानं गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. पण यावर्षीचा गुढीपाडवा संचारबंदी लागू केल्यामुळे कुठेही न जाता कुटुंबासमवेत नागरिकांनी साजरा केला. नविन वर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष गाठी भेटी घेऊ शकत नसल्याने कोरोना संकट टळुन सर्वांना निरोगी आयुष्य लाभो अशा सदिच्छा एकमेकांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून देण्यात आल्या.
मराठी नववर्षाची गुढी उभारण्यासाठी आणि तिची पूजा करण्यासाठी पुजेसाठी लागणारी फुलं, साखरेच्या माळा, दारावर तोरण, गोडधोड पदार्थ, बांबूची काठी असे सर्व साहित्य शहरी भागासह ग्रामीण भागात तुटवडा आला होता.ग्रामीण भागातील किराणा दुकानातील पुजेसाठी लागणारे साहित्य सकाळीच संपल्याने नागरिकांनी यंदा आरोग्याच्या हितासाठी पूजेच्या साहित्याची कशीबशी जुळवाजुळव करून गुढी उभारली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button