Maharashtra

बिसलेरी च्या युगात हरवाडी ग्रामस्थांना गटारीचे पाणी

बिसलेरी च्या युगात हरवाडी ग्रामस्थांना गटारीचे पाणी

प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे

रेणापुर: हरवाडी आज जगभर एकच चर्चा ति म्हणजे कोरोना! शासन प्रशासन जिवाची परवा न करता कोरोनापासुन नागरिकांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. गाव पातळीवर त्या त्या पध्दतीने प्रत्येक ग्रामपंचायत कोरोनाला रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत आणी गावातील नागरिक सुध्दा सहकार्य करत आहेत . स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये लोकसभा किंवा विधानसभा पेक्षाही ग्रामपंचायत ला अधिक महत्त्व असते सध्याच्या काळात तर ग्रामपंचायत ला विशेष अधिकार व भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे याच आर्थिक तरतुदींच्या व कल्पकतेचा जोरवारती अनेक ग्रामपंचायतीचे रूपडे पालटले आहे हीवरे बाजार सारख्या अनेक ग्रामपंचायत आदर्श मॉडेल म्हणून आपल्या समोर उभ्या आहेत अशा अनेक ग्रामपंचायती बद्दल एकतो, बोलतो प्रत्यक्ष पाहतो पण महाराष्ट्रात नव्हे तर देश पातळीवर नावारूपास आलेल्या लातूर पॅटर्नच्या महणजेच लातूर शहराच्या गाव कुशीत असलेल्या हारवाडी ग्रामपंचायत ने या सर्व तिलांजली देत चक्क गावातील ग्रामस्थांना गटारीचे पाणी देण्याचा लाजिरवाणा उपक्रमाचं हाती घेतला आहे.
कोरोना महामारीच्या संकटात सरकार स्वच्छते बद्दल सजग राहण्याचा सल्ला देत आहे .स्वच्छता बाळगा, शुध्द पाणी वापरा असे आदेश प्रशाशना कडून वारंवार देण्यात येत आहेत या असवच्छते मूळे कोरोणा बरोबरच विविध गंभीर आजार हारवाडी ग्रामस्थांना होण्याची दाट शक्यता आहे. हारवाडी करांसाठी शुद्ध पाणी तर सोडाच दोन महिण्यापासुन चक्क गटारीचे पाणी दिले जात असल्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रापंचायतीला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर मिटवता आलाच नाही पण … चक्क लातुर च्या गटारिचे पाणी ग्रामस्थाना दिले जात आहे.हारवाडी मध्ये आज घडीला एकच चर्चा ति म्हणजे हरवाडी गावामध्ये लातुर च्या गटारिचे पाणी दिले जात असल्याची आहे .या गटारीच्या पाण्यामुळे साथिचे रोग, त्वचा रोग व गंभीर आजार ग्रामस्थांना जडण्याची भीती आहे. हे विदारक दृश्य हारवाडी ग्रामपंचायतीला दिसत नाही का हाच खरं प्रश्न आहे. हरवाडी ग्रामपंचायतिस मोतीबिंदू झाला आहे कि , झोपेचे सोंग घेऊन मुगगिळून ग्रामपंचायत विकासाचा खोटा आविर्भाव करत आहे.
गेंड्याची कातडी पांघरलेल्या ग्रामपंचायत ची चौकशी करून ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणाऱ्या ग्रामपंचायतीवर कायदेशीर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button