Pune

पुण्यात वाढती भाईगिरी..! 3 आरोपींसह गावठी पिस्तुल,कट्टा,एअरगन आणि काडतुसे पोलिसांच्या ताब्यात…!

पुण्यात वाढती भाईगिरी..! 3 आरोपींसह गावठी पिस्तुल,कट्टा, एअरगन आणि काडतुसे पोलिसांच्या ताब्यात..!

दत्ता पारेकर

मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही भाईगिरी वाढली आहे. एकाच दुचाकीवर फिरणार्‍या तिघा तरुणांकडून गावठी पिस्टल, गावठी कट्टा आणि एअर गन जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

आज दि.६ रोजी पहाटे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तपास पथकाचे अंकुश कर्चे यांना पहाटे २ च्या सुमारास नारायणी धाम मंदिराजवळ कात्रज येथे नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवर तीनजण संशयितरित्या आढळुन आले.त्यांना पोलीसांनी हटकताच ते पळत सूटले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपी १) सौरभ रामचंद्र सोळसकर वय-२२ रा. बालाजीनगर २) शुभम आबा कसबे वय-२१, रा.गुजर निंबाळकरवाडी ३) दत्तात्रय राजाराम पाटोळे वय-१९ रा.गुजर निंबाळकरवाडी असल्याचे सांगितले.

आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल, २ काडतुसे, देशी बनावटीचा गावठी कट्टा व एअर गन आढळून आली. आरोपींकडून एकूण ८९,९००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत भारती पोलीस स्टेशन येथे आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो.उपनि. नितीन शिंदे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button