Amalner

विविध सामाजिक संघटनांतर्फे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन…

विविध सामाजिक संघटनांतर्फे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन…

अमळनेर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंती निमित्ताने अभिवादन अमळनेर शहर व तालुक्यातील विविध संघटनांनी अभिवादन केले. यात पैलाड येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची पूजा करून माजी आमदार शिरिषदादा चौधरी आणि आदिवासी एकता संघर्ष समिती च्या प्रदेशाध्यक्षा प्रा जयश्री दाभाडे यांनी अभिवादन केले. यावेळी नगरसेवक बाळासाहेब संदनशिव,पंकज चौधरी ,शशांक संदानशिव,विजय गाढे,प्रवीण बैसाणे,भिम आर्मी चे कृष्णकांत शिरसाठ,बाळासाहेब संदानशिव,आत्माराम अहिरे इ उपस्थित होते. यावेळी पैलाड भागातील रहिवाशी यांना अन्नदानाचा लाभ देण्यात आला होता. तसेच धुळे रोड वरील आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस देखील अभिवादन करण्यात आले.

भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे अण्णाभाऊ साठे स्मारक येथे सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अमृत महाजन यांनी कॉ.अण्णाभाऊ यांच्या जीवनकार्याचा परिचय देत लाल सलाम केला.यावेळी जिल्हा सचिव लक्ष्मण शिंदे, वानखेडे, यशवंत बैसाने, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, पातोंड्याचे माजी सरपंच महेंद्र पाटील, पंकज माळी, चंद्रकांत माळी किशोर भील आदि उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button