Nashik

थोरात विद्यालयात राष्ट्रसंत गाडगे महाराज कर्मवीर बाबुराव ठाकरे यांना अभिवादन …….

थोरात विद्यालयात राष्ट्रसंत गाडगे महाराज कर्मवीर बाबुराव ठाकरे यांना अभिवादन …….

सुनिल घुमरे नासिक विभागिय प्रतिनिधी
……
मविप्र संचालित कर्मवीर रावसाहेब थोरात व ज्युनिअर काॅलेज मोहाडी विद्यालयात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती व कर्मवीर बाबुराव ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्रीराम खुर्दळ होते .अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.संगीत शिक्षक दिलीप पागेरे व गीतमंचने गोपाला गोपाला रे देवकीनंदन गोपाला हे भजन सादर केले इयत्ता आठवीच्या विद्यार्थीनी नुतन हिंगे व तन्मय गायकवाड व अस्मिता काठे यांनी गाडगेबाबा व कर्मवीर बाबुराव ठाकरे यांच्या कार्याविषयी माहिती दिली.
उपशिक्षक प्रमोद सोनवणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्रीराम खुर्दळ यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज व कर्मवीर बाबुराव ठाकरे यांच्या जीवनकार्यांविषयी माहिती दिली.गाडगे महाराज यांनी गावोगावी जाऊन लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवुन दिले .दिवसभर ग्रामस्वच्छता करून रात्री किर्तनाच्या माध्यमातुन समाजप्रबोधन केले.समाजातील रूढी, परंपरा ,अंधश्रद्धा दुर करण्याचे काम केले .तसेच कर्मवीर बाबुराव ठाकरे यांनी मविप्रच्या माध्यमातुन शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहचवण्याचे काम केले .ग्रामीण भागातील बहुजण समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महत्वाचे काम केले .आपण सर्वांनी या दोन्हीही महापुरुषाचा आदर्श घेऊन कामकाज करावे असे आह्वान केले.कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता आठवीच्या वर्गशिक्षिका प्रतिभा पाटील यांनी केले.
कार्यक्रमास अभिनव,माध्यमिक व उच्च माध्यमिकचे सर्व शिक्षक ,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राची देशमुख यांनी केले व न आभार प्रदर्शन श्रद्धा पांडव यांनी मानले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button