Ahamdanagar

थोरात विद्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना अभिवादन

थोरात विद्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना अभिवादन

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

मोहाडी दि.२०
मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात व ज्युनिअर कॉलेज मोहाडी विद्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीराम खुर्दळ होते. अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचा गीतमंच व संगीत शिक्षक दिलीप पागेरे यांनी *गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला* हे गाडगेबाबाचे आवडते भजन सादर केले.इयत्ता दहावीची विद्यार्थ्यिनी यमुना ठाकरे हिने गाडगेबाबा यांचे बालपण व जीवन कार्याविषयी माहिती दिली.उपशिक्षक प्रमोद सोनवणे व महेंद्र डांगले यांनी गाडगेबाबाचे यांच्या कार्याविषयी माहिती दिली. गाडगेबाबा यांनी आपल्या कीर्तनातुन समाजातील दांभिकपणा, रूढी,परंपरा यावर टीका केली. लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवुन दिले. प्राचार्य श्रीराम खुर्दळ यांनी सांगितले की आज गाडगेबाबा यांच्या विचाराची समाजाला गरज आहे. त्यांचे विचार अंगीकारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.आपण सर्वांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा असे आह्वावान केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री भोई हिने केले.व आभार गौरी शिंगाडे हिने केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button