Nashik

थोरात विद्यालयात लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

थोरात विद्यालयात लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

मोहाडी दिनांक ११ जानेवारी
मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात व जुनिअर कॉलेज मोहाडी विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्रीराम खूर्दळ होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व पर्यवेक्षिका प्रमिला देशमुख यांच्या हस्ते लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. उपशिक्षक वसंत पगार यांनी लाल बहादूर शास्त्री यांचे बालपण, शिक्षण, व स्वातंत्र्य लढ्यातील योगदानिविषयी माहिती दिली. पर्यवेक्षिका प्रमिला देशमुख यांनीही लाल बहादूर शास्त्री यांच्या भारतीय राजकारणातील योगदानाविषयी माहिती दिली. साधी राहणी व उच्च विचारसरणी त्यांच्याकडे होती. मूर्ती लहान व किर्ती महान असे त्यांचे वर्णन केले जाते .लालबहादूर शास्त्री यांनी भारत-पाक युद्धाच्या वेळी आपल्या जवानांचे तसेच शेतकऱ्यांची मनोधैर्य वाढवण्यासाठी जय जवान- जय किसान हा नारा दिला होता.आपण सर्वांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा असे सांगितले
कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सांस्कृतिक समितीचे प्रमुख दिलीप पागेरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.शरद निकम यांनी केले तर प्रदीप जाधव यांनी आभार मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button