Nashik

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ही आय टु युनियन वतीने रक्तदान करून केले अभिवादन.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ही आय टु युनियन वतीने रक्तदान करून केले अभिवादन.
शांताराम दुनबळे.
नाशिक प्रतिनिधी- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आंबेडकरी विचारधारेच्या युवकांनी ही आय टु युनियन वतीने रक्तदान करून अनोखे अभिवादन केले. नाशिक येथील सिटू भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन सिटू संघटना MBCPR team, दान पारमिता फाउंडेशन नाशिक, समता सैनिक दल, सम्यक विद्यार्थी संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.

विशेष म्हणजे आजच्या दिवशी सुनील खरे व नूतन खरे ह्या दोघंही पती पत्नीने रक्तदान करून बाबासाहेबांना एक कृतज्ञता पूर्वक अनोखे अभिवादन केले.

रक्तदान शिबिरात आज विलास वाघमारे, संजय गायकवाड, गुणवंत शिंदे, अंकित दोंदे, नितीन पिंपळीसकर, आकाश खरे, बाबाराव नाईक, अनिल खरे, आत्माराम डावरे, सुनील खरे, निवृत्ती केदार यांच्यासह 45 बांधवानी रक्तदान करून
बाबासाहेबांना एक अनोख्या पध्दतीने अभिवादन केले.

ह्यावेळी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
प्रत्येक महिन्यात एकदा डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार व्याख्यानमाला आयोजित करण्याचे ठरवण्यात आले, व त्या माध्यमातून बाबासाहेब यांचे शेतकरी, कामगार, महिला , जलनीती व सर्वव्यापी बाबासाहेब व्यख्यानातून जनजागृती करण्याचे ह्यावेळी डॉ डी एल कराड यांच्या सल्ल्याने ठरवण्यात आले.

सकाळी रक्तदान शिबिराचे उदघाटन सिटू संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ. डॉ.डी.एल.कराड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिटु संघटनेचे कॉ. तुकाराम सोनजे, कॉ. सीताराम ठोंबरे कॉ. संतोष काकडे कॉ. देविदास आडोळे उपस्थित होते
तत्पूर्वी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले,
या शिबिरास यशस्वी करण्यासाठी संतोष आंभोरे, कॉ.आत्माराम डावरे, कॉ. सुनील खरे, नितीन पिंपळीसकर, कॉ. रावसाहेब धिवर, आकाश खरे, रवींद्र आढाव, आराध्या गायकवाड, किशन आंभोरे, हृषिकेश चव्हाण, सुमित दातीर , प्रभाकर लोखंडे इत्यादींनी प्रयत्न केले…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button