Faijpur

संत रविदास जयंतिनिमित्त फैजपूर येथे दिव्यांग सेना व नारीशक्ती तर्फे अभिवादन

संत रविदास जयंतिनिमित्त फैजपूर येथे दिव्यांग सेना व नारीशक्ती तर्फे अभिवादन

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल शिवकॉलनी फैजपूर येथे संत रविदास महाराज यांना अभिवादन का करण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्त्या व खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग सेना तालुकाध्यक्ष नानाभाऊ मोची यांच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोकजी भालेराव, इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन जिल्हा उपाध्यक्ष संदिप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.संत रविदास यांचे विचार आचरणात आणले तर नक्कीच सर्वधर्म समभाव प्रस्थापित होईल असे प्रतिपादन यावेळी नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी यांनी केले.संत रविदास यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मानवजातीला मार्गदर्शन केले आहे असे प्रतिपादन अशोक भालेराव यांनी केले. सुत्रसंचालन अशोक भालेराव यांनी तर आभारप्रदर्शन नाना भाऊ मोची यांनी केले. यावेळी कोरोनाचे संकट लक्षात घेऊन मोजक्या ४-५ जणांच्या उपस्थितीत संत रविदास महाराज जयंती साजरी करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button