Faijpur

मातोश्री फाउंडेशन च्या आरोग्य शिबिराला भरघोस प्रतिसाद

मातोश्री फाउंडेशन च्या आरोग्य शिबिराला भरघोस प्रतिसाद

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

मातोश्री फाउंडेशन पिंपरुड ता यावल यांच्या विद्यमाने गट क्र ४३९ पिंपरुड फाटा येथे स्व सुभद्रा जंगले यांच्या पुण्यस्मरणार्थ
आरोग्य शिबीर संपन्न झाले या शिबिराला भरघोस प्रतिसाद मिळाला याप्रसंगी ४५० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येवून त्यांना मोफत औषधी देण्यात आली तसेच २५ रुग्ण मोतिबिंदू च्या मोफत शस्त्रक्रिया साठी कांताई नेत्रालय जळगांव येथे रवाना करण्यात आले व ४२ नागरिकांनी स्वश्चने देहदनाचा संकल्प पत्र भरून दिले
याप्रसंगी मातोश्री फाउंडेशन च्या उद्घाटक सिंधुताई सपकाळ यांना शिबीराचे प्रारंभी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला तद्नंतर संस्थाध्यक्ष जनार्दन जंगले यांनी प्रास्ताविकात मातोश्री फाऊंडेशन च्या सामाजिक वाटचालीचा उवापोहा मांडून सातत्याने मातृभूमी व परिसरातील गरजू नागरिकांच्या सर्वोतोपरी सेवेला कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले
जंगले परिवार हा शहरी जीवन जगत असतांनाही ग्रामीण भागातील दीन दुबळ्याचा सेवा माध्यमातून आपल्या मातृभूमीशी असलेली नाळ जोपासण्याच्या मनोधैर्य आदर्शदायी असून यांचा आदर्श शहरातील नागरिकांनी घ्यावा असे प्रतिपादन उद्घघटकीय मनोगतात डॉ राजेंद्र झांबरे डो कठोरा यांनी केले आहे
वैद्यकीय सेवेसाठी डॉ राजेंद्र झांबरे,कांताई नेत्रालय चे डॉ राजेंद्र गौतम ,हृतिक सराफ यांनी तसेच शिबिराचे यशस्वी ते साठी संस्था उपाध्यक्ष चंद्रकांत जगले,सौ मधुबाला जंगले, सुधाकर पाटील,गोकुळ पाटील, यांनी अथक परिश्रम घेतले
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील, व सौ शकुंतला पाटील, विरोदा माजी सरपंच सतीश चौधरी,मुख्याध्यापक सलिम तडवी, पत्रकार शाकिर मलिक,राजेंद्र तायडे,संजय सराफ, विजय सराफ यासह पिंपरुड, सावदा, फैजपूर, विरोदा,भालोद, जानोरी,निभोरा, रावेर यावल तालुकाभरातून गरजू नागरिकांची उपस्थिती होती

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button