Faijpur

फैज मल्टीपर्पज व गोदावरी फाउंडेशन च्या महाआरोग्य शिबिरास भरघोस प्रतिसाद

फैज मल्टीपर्पज व गोदावरी फाउंडेशन च्या महाआरोग्य शिबिरास भरघोस प्रतिसाद

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल

फैज मल्टीपर्पज फाउंडेशन फैजपूर व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृह रायपूर येथे आज दिनांक १२ फेब्रुवारी २०२२ शनिवार रोजी भव्यदिव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजनास शहरवासीय यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला या शिबिराच्या अध्यक्षस्थानी फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे होते ,तरुणांनी जाती पातीचे रिकामे कामे न करता सर्वसामान्यांची मूलभूत गरजा ओळखून आरोग्य शिबिरा सारखे सकारात्मक कार्य शहरातील तरुणांकडून घडते याचा मनस्वी आनंद होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले आहे
सदर शिबिराचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले सर्व उपस्थित मान्यवरांचे मल्टीपर्पज फाउंडेशन च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी सभा मंचावर सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर ,डॉ शेख जलील – जळगाव ,जमीयत उलेमा अध्यक्ष आफिस अनस, शकील हनानं, मारुळ सरपंच सय्यद अनस, डॉ जुनेद कामील, डॉ प्रियांका भानके, डॉ अनुजा गाडगीळ ,डॉ परिजीत पाटील, डॉ वैभव फास्के आदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक हारुन उस्मानी भुसावळ यांनी केले सदर शिबिरात हृदयविकार उच्च रक्तदाब नेत्रविकार कान-नाक-घस श्री रोग मेडिसिन आदी अनेक विभागांची स्वतंत्र तपासणी कक्षाद्वारे सुमारे ५५० रुग्ण नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली आहे यातील ५० रुग्ण पुढील मोफत शस्त्रक्रिया व उपचारासाठी दिनांक १५/२/२०२२ मंगळवार रोजी सकाळी शिबिर स्थळावरून वाहनाची व्यवस्था करून गोदावरी रुग्णालय जळगाव येथे रवाना होणार असल्याची माहिती मल्टीपरपज दिली आहे
याप्रसंगी शहरातील डॉ उमेश चौधरी, डॉ सुनील पाटील, डॉ शेख दानिश, डॉ कुलकर्णी, माजी नगरसेवक कलीमखान मणियार, शेख इक्बाल मामू ,पत्रकार शेख कमिल ,मुदस्सर नजर यांनीही आवर्जून भेटी दिल्या
वैद्यकीय तपासणीसाठी जुनेद कामिल प्रियांका भालके परीक्षित पाटील अनुजा गाडगीळ वैभव फास्के विवेक रामदास जी सरिता नायर जनसंपर्क अधिकारी रत्न सेखर जैन विशाल शेजवळ टेक्निशियन जयेश जोशी संगणक डिंपल पाटील अमोल पाटील यांनी परिश्रम घेतले
फैज मल्टीपर्पज फाउंडेशन अध्यक्ष शेख अन्सार उपाध्यक्ष शेख इम्रान सचिव अनुज खान सदस्य मोहम्मद आरिफ अखिल खान शेख नईम शाकीर मलक सय्यद फारूक एकदा फाउंडेशन अध्यक्ष शेख इरफान मेंबर सत्तार मिस्तरी इम्रान खान कामिल खान शफिक मद्रासी शेख कल्प इंजिनीयर मुदस्सर नजर शेख अन्सार शेख चौ सिफ अकिरा लोहार शेख असिफ अल्ल तजमज शेख शोएब शाहिद खान फारुख सय्यद शोएब याकूब मुल्लाजी आदींनी शिबिराच्या यशस्वितेसाठी अथक परिश्रम घेतले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button