पंढरपूर

स्वेरीतील प्राध्यापकांच्या योगदानामुळे तंत्र शिक्षणाच्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल

स्वेरीतील प्राध्यापकांच्या योगदानामुळे तंत्र शिक्षणाच्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल

के.बी.पी.च्या विभागप्रमुख डॉ. लतिका बागल
कर्मवीर भाऊराव पाटील विज्ञान महाविद्यालयाने दिली स्वेरीला सदिच्छा भेट

रफिक अत्तार

पंढरपूर-‘स्वेरीतील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांवर केलेले ‘उत्तम संस्कार’ आणि ‘आदरयुक्त शिस्त’ याच्या भांडवलावर तयार झालेले गुणवत्ता पूर्ण विद्यार्थी यांनीच स्वेरीचे नाव देश पातळीवर नेवून ठेवले असल्याचे दिसून येत आहे. येथील विद्यार्थ्यांना घडविण्यात स्वेरीच्या प्राध्यापकांचे मोलाचे योगदान लाभत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वेरीत प्रवेश घेण्याची ओढ लागलेली असते. स्वेरीत उच्च तंत्रशिक्षण घेवून येथील विद्यार्थी देशपातळीवर आणि प्रशासकीय सेवेत आपला ठसा उमटवीत आहेत. याचे संपूर्ण श्रेय संस्थेचे सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे सर व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या प्राध्यापकांना जाते. यामुळे येथील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल आहे.’ असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विज्ञान महाविद्यालय, पंढरपूरच्या फिजिक्स या विषयाच्या विभागप्रमुख डॉ. लतिका बागल यांनी केले.
परीक्षाची लगबग आणि लेक्चर्स संपल्यामुळे शांत असलेल्या स्वेरीच्या कॅम्पसमध्ये आज विद्यार्थ्यांचा वावर अधिक जाणवत होता. त्याचे असे झाले की, रयत शिक्षण संस्था संचलित कर्मवीर भाऊराव पाटील विज्ञान महाविद्यालय,पंढरपूर मधील बी.एस.सी.च्या तृतीय वर्षातील जवळपास पन्नास विद्यार्थी व विद्यार्थिनी उत्साहाने ‘स्वेरी’ आणि ‘स्वेरीतील शिक्षण पद्धती’ समजावून घेण्यासाठी आणि ‘स्वेरी’ आणि ‘कर्मवीर भाऊराव पाटील विज्ञान महाविद्यालय,पंढरपूर’ यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच्या पार्श्वभूमीवर आणि विज्ञान अभ्यासाचा एक भाग म्हणून विद्यार्थी स्वेरीत आले होते. विद्यार्थ्यांनी वर्कशॉप, अत्याधुनिक मशीन्स, अँपी थिएटर, आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉल, संशोधन विभाग, मध्यवर्ती वाचनालय, इंटरनेट सर्व्हर रूम, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागासह इतर विभागांना भेटी देवून संबंधित प्राध्यापकांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. स्वेरीच्या विद्यार्थ्यांमधील आपसातील सुसंवाद, शिस्त, नियोजन याचा उत्तम मिलाप पाहून के.बी.पी.चे विद्यार्थी उत्साही झाले होते. यावेळी उमा लक्ष्मण शिंदे व करिश्मा अब्दुल शेख या विद्यार्थीनींनी स्वेरीविषयी मनोगत व्यक्त केले. स्वेरीत आलेले प्राध्यापक व विद्यार्थ्याना माहिती देण्यासाठी संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर.पाटील, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे, डॉ. संताजी पवार, आदी प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. यावेळी के.बी.पी. महाविद्यालयाचे डॉ.संजय चव्हाण, प्रा.श्रेया भोसले, प्रा.आदित्य अलाट, प्रा. ओंकार मोहीकर, प्रा. दिनेश शिंदे, प्रा. रमेश बंडगर यांच्यासह ५० विद्यार्थी, संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, डॉ. विश्वासराव मोरे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. करण पाटील यांच्यासह अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
छायाचित्र- स्वेरी रयत शिक्षण संस्था संचलित कर्मवीर भाऊराव पाटील विज्ञान महाविद्यालय,पंढरपूर मधील बी.एस.सी.च्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांसमवेत कर्मवीर भाऊराव पाटील विज्ञान महाविद्यालयाच्या फिजिक्स विषयाचे विभागप्रमुख डॉ. लतिका बागल,डॉ.संजय चव्हाण, प्रा.श्रेया भोसले, प्रा.आदित्य अलाट, प्रा. ओंकार मोहीकर, प्रा. दिनेश शिंदे, प्रा. रमेश बंडगर, संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, डॉ. विश्वासराव मोरे, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर.पाटील, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे, डॉ. संताजी पवार यांच्यासह प्राध्यापकवर्ग.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button