Nashik

राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार – : विलास शिंदे

राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार – : विलास शिंदे

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असून महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाच्या माध्यमातून राज्यभरातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सर्वेसर्वा विलास अण्णा शिंदे यांनी केले. शिंदे हे मराठा विद्या् प्रसारक संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात व ज्यु काॅलेज मोहाडी शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने आयोजित राज्य द्राक्ष बागायतदार संघ नवनियुक्त संचालक सत्कार सोहोळ्या प्रसंगी बोलत होते. आशिया खंडातील शेतकर्‍यांची पहिली कंपनी म्हणून नावलौकिक असलेल्या सह्याद्रि फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे व सुरेश कळमकर यांची महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ पुणे संघाच्या संचालक पदी व बाळासाहेब गडाख यांची संघाच्या नासिक विभाग मानद सचिव पदी निवड झाल्याबद्दल हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादवा साखर कारखाना संचालक शहाजी दादा सोमवंशी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष विलास अण्णा पाटील, सुदामराव पाटील,राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, रंगनाथ घोलप,गणपत पाटील,नंदकुमार डिगोंरे, सुधाकर सोमवंशी, शिवाजी नाठे, निवृत्ती घुमरे, वसंत देशमुख, लक्ष्मण देशमुख, प्रभाकर देशमुख,रविंद्र देशमुख, अशोक जाधव, प्राचार्य श्रीराम खुर्दळ ,आय टी आयचे प्राचार्य हेमंत उगले, पर्यवेक्षिका प्रमिला देशमुख, प्रदीप जाधव आदी उपस्थित होते. राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे नवनियुक्त संचालक सुरेश मामा कळमकर व बाळासाहेब गडाख यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अद्यावत तंत्रज्ञानाने शेतीव्यवसाय करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात शहाजी दादा सोमवंशी यांनी नवनियुक्त संचालक यांच्या द्राक्ष उत्पादन क्षेत्रातील भरीव योगदानावर प्रकाश झोत टाकत नाशिक जिल्ह्यातील कोहिनूर हिरे म्हणुन स्तुतिसुमने उधळली. प्रास्ताविक प्राचार्य श्रीराम खुर्दळ सुत्रसंचालन रामनाथ गडाख यांनी तर आभार शरद निकम यांनी मानले. यावेळी ग्रामस्थ, द्राक्ष उत्पादक शेतकरी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित मोठ्या संख्येने होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button