Mumbai

ओबीसी आरक्षण विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी

ओबीसी आरक्षण विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी

ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा

मुंबई प्रतिनिधी । सुशिल कुवर : विधिमंडळच्या हिवाळी अधिवेशनात एकमताने मंजूर केलेल्या ओबीसी राजकीय आरक्षण विधेयकाला अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे. या विधेयकावर त्यांनी स्वाक्षरी केल्यामुळे स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

हिवाळी अधिवेशनात सभागृहात सर्व सदस्यांनी एकमताने ओबीसी राजकीय आरक्षण विधेयक मंजूर केले होते. त्यानंतर हे विधेयक राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, या विधेयकावर राज्यपाल कोश्यारी यांची स्वाक्षरी झालेली नव्हती. मंगळवारी आघाडी सरकारच्या नेत्यांनी राजभवन येथे जाऊन राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली.

मात्र, त्यापूर्वीच राज्यपाल कोश्यारी यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली होती, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच, त्यांनी राज्यपाल यांचे आभार मानत या विधेयकावर सही केल्यामुळे आता हा विषय संपला आहे, अशी प्रतिक्रिया पवार यांनी प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button