Pandharpur

राज्यपाल व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घालुन देणार .आ पडळकर

राज्यपाल व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घालुन देणार .आ पडळकर
पंढरपूर : उजनी जलाशयातील ५ टीएमसी पाणी ‘सांडपाणी’ या शब्दाला झालर देऊन बारामतीकरांनी इंदापूरला वळविले आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील या लोकांनी दिशाभूल केली असुन सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. हा प्रश्न घेवुन आज उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने विधानपरिषद सदस्य आ.गोपीचंद पडळकर यांची भेट घेतली असुन याप्रश्नी समितीने केलेल्या मागणीनुसार राज्यपाल भगतसिंह कोशारी व माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेता देवेंद्र फडणवीस यांची भेट घालुन देण्याचे आश्वासन पडळकरांनी संघर्ष समितीला दिले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयातील ५ टीएमसी पाणी इंदापूर येथील प्रकल्पासाठी घेवुन जाण्याच्या निर्णयावर जिल्हामध्ये असंतोष पसरला. बारामती आणि इंदापूरकरांच्या जुलमी निर्णयाविरोधात पालकमंत्र्याचा पुतळा बुडवुन, पुतळ्याला जोडे मारुन निषेध व्यक्त केला तर १ मे रोजी वेगवेगळ्या संघटनांच्या नेत्यांनी उजनी जलाशयात जलसमाधी आंदोलन केले. त्यावेळी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांची बैठक लावण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते मात्र ऐनवेळी सोलापूर येथील नियोजन भवन येथे लावलेली बैठक रद्द केली त्यामुळे पुन्हा एकदा तीव्र शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त झाला.
दरम्यान उद्या सिंचन भवन पुणे येथे आंदोलक शेतकरी, पालकमंत्री दत्तात्रय भरणे व सिंचन अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली असुन या बैठकीच्या पाश्वर्भूमीवर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांची भेट घेवुन जिल्ह्यातील व्यथा मांडल्या मांडुन याप्रकरणी लक्ष घालुन राज्यपाल भगतसिंह कोशारी व माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांची भेट घालुन देण्याचे आश्वासन यावेळी गोपीचंद पडळकरांनी संघर्ष समितीला दिला आहे.
यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील, सचिव माऊली हळणवर, कार्याध्यक्ष सुहास घोडके, उपाध्यक्ष ॲड. बापूसाहेब मेटकरी, सहसचिव किरण भांगे, सदस्य धनाजी गडदे, विठ्ठल मस्के आदी उपस्थित होते.
@ सोबत फोटो मेल केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button