Dhule

शिरपूर तालुक्याच्या आदिवासी भागातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोडीद, सांगवी, बोराडी, रोहिणी येथील प्राथ. आरोग्य केंद्रात सरकार तर्फे प्रत्येकी 50 ऑक्सिजनयुक्त बेडचे कोविड सेंटर सुरू करणेबाबत..

शिरपूर तालुक्याच्या आदिवासी भागातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोडीद, सांगवी, बोराडी, रोहिणी येथील प्राथ. आरोग्य केंद्रात सरकार तर्फे प्रत्येकी 50 ऑक्सिजनयुक्त बेडचे कोविड सेंटर सुरू करणेबाबत..

राहुल साळुंके धुळे

धुळे:

महोदय,
वरील विषयान्वये निवेदन सादर करण्यात येते की, संपूर्ण देशात कोरोनाची लाट आली आहे. कोरोनाच्या या महामारीत अनेक निष्पाप लोकांचा बळी जात आहे. सर्वसामान्य लोकांना इंजेक्शन, ऑक्सिजन बेड मिळत नाही. अशी गंभीर परिस्थिती सर्वत्र आहे. शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील कोडीद, सांगवी, बोराडी, रोहिणी परिसरातही कोविड सदृश वा तत्सम आजाराच्या साथीचा प्रसार होतो आहे.
महोदयांना विनंती की, आदिवासी भागातील कोडीद येथे प्रशस्त इमारत असलेली शासकीय माध्यमिक आश्रम शाळा आहे, तसेच सांगवी, बोराडी, रोहिणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्या ठीकाणी प्रत्येकी 50 ऑक्सीजनयुक्त बेडचे कोविड सेंटर सुरू करावे. जेणेकरून आदिवासी भागातील लोकांचा कोरोना या महामारी पासून बचाव करण्यासाठी योग्य तो उपचार मिळेल. आणि त्यांचा जीवही वाचेल.
आमच्या निवेदनाचा सहानुभूतीपुर्वक विचार करून, शासकीय आश्रम शाळा कोडिद, सांगवी, बोराडी व रोहीणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू करण्याबाबत आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी.

हि नम्र विनंती.

– डॉ.हिरा पावरा
जय आदिवासी युवा शक्ती (JAYS) महाराष्ट्र, उपाध्यक्ष.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button