Jalgaon

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव यंत्रणेचा भोंगळ कारभार अपंग बांधवांना होतोय त्रास फार

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव यंत्रणेचा भोंगळ कारभार अपंग बांधवांना होतोय त्रास फार

प्रतिनिधी- प्रविन पाटील

अपंग बांधवांच्या समस्या ह्या दिवसेंदिवस वाढतच आहेत मात्र प्रशासनाच्या ह्या गलथन कारभारा मूळे अपंगाना विवीध समस्या ना सामोरे जावे लागत आहे याचा च प्रत्यय जळगांव येथील शासकीय वैदकिय महाविद्यालय व रुग्णालय येथे पहावयास मिळतो गेल्या दोन वर्षा पासून कोविड चा संसर्गा चा फैलाव होऊ नये म्हणून अपंग बांधवांच तपासणी केंद्र काही महिन्यान साठी बंद केले होते त्यानंतर काही महिण्या नंतर वैद्यकिय महाविद्यालयाने अपंग बांधवांना कूपन वाटप पद्धती नुसार तपासणी करण्याचे ठरविले आज ही कूपन पद्धतीने अपंग बांधवांना दोन ते तीन वेळेस चकरा माराव्या लागतात सदरील कूपन पद्धतीने अपंग बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच आठव्यातला एकच दिवस हा सदरील बोर्ड ने ठरविल्या मुळे अपंग बांधवांची धांदल उडत आहे तसेच सरटिफिकेट साठी अपंग बांधवांना वर्ष वर्ष वाट पहावी लागते तसेच सदरील हॉस्पिटल मध्ये काही एजंट लोक हे अपंग बांधवांनकडून पैसे घेऊन त्यांचे नंबर लावून देतात अशा भावना अपंग बांधवानी व्यक्त केल्या डिजिटल इंडिया म्हणून शासन एकिकडे दिखावा करते हाच का डिजिटल इंडिया असा प्रश्न पडतो तसेच अपंग बांधवांना हॉस्पिटल च्या वारंवार माराव्या लागनाऱ्या चकरा कधी बंद होतील व अपंग बांधवाना प्रशासन न्याय देऊ शकेल का व जळगांव हॉस्पिटल ही कूपन पद्धत बंद कधी करणार अशा विवीध प्रश्न अपंग बांधवांना पडतो तसेच सदरील अपंग बोर्ड मधील अध्यक्ष व डॉक्टरांची बदली करून नवीन बोर्ड स्थापन करावे अशी आशा अपंग बांधवानी व्यक्त केल्या

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button