Faijpur

फैज़पुरात शासकीय रुग्णालय व्हावे,खिदमते मिल्लत फाउंडेशनच्या वतीने शिरीष दादा चौधरी यानां निवेदन

फैज़पुरात शासकीय रुग्णालय व्हावे,खिदमते मिल्लत फाउंडेशनच्या वतीने शिरीष दादा चौधरी यानां निवेदन

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : फैज़पुर शहरातील वाढती लोकसंख्या व सध्या देशात आलेली कोरोना सारखी महामारी अशा स्थितीत शहरातील गोरगरीब जनतेच्या आरोग्य सेवेची काळजी व्हावी व अल्पदरात आरोग्यसेवा मिळावी म्हणून खिदमते मिल्लत फाउंडेशन फैज़पुर तर्फे आमदार शिरीष दादा चौधरी यानां निवेदन देण्यात आले फैज़पुर शहर हा दोन्ही तालुक्यातील मध्यभागी आहे शहरातील प्रांताधिकारी कार्यालयाच्या धर्तीवर शहरांत उपजिल्हा रुग्णालय किंवा शासकीय रुग्णालय व्हावे यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावे
फैज़पुर शहरातील व शेजारी असलेल्या गावांच्या नागरिकांना सुद्धा याचं लाभ मिळेल शहरातील गोरगरीब जनतेला उपचारासाठी शेजारी असलेल्या न्हावी किंवा यावल येथे जावं लागतं यासाठी खिदमते मिल्लत फाउंडेशनने आमदार शिरीष दादा चौधरी यांचा कडे निवेदन सादर केले
यावेळी खिदमते मिल्लत फाउंडेशनचे अध्यक्ष मुदस्सर नजर उपाध्यक्ष फारुक जनाब, इमरान खान ,शेख शफीक, कामील खान ,शेख नाजीम,शेख अखतर यांनी निवेदन दिले
यावेळी जि प गटनेते प्रभाकर सोनवणे,कलिम खान,केतन कीरंगे ,शेख रियाज, आसीफ मॅकेनिक,वसीम जनाब,वसीम तडवी,अजय मेढे उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button