India

अँड्रॉइड फोन साठी गुगलची मोठ्या अपडेट ची घोषणा..!हे असतील नवीन फीचर्स…!

अँड्रॉइड फोन साठी गुगलची मोठ्या अपडेट ची घोषणा..!हे असतील फीचर्स…!

गुगल ने अँड्रॉइड 12 मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम अधिकृतपणे लवकरच लाँच करणार आहे. त्या आधी आधी Android OS साठी मोठ्या अपडेटची घोषणा केली आहे. यात अनेक नवे फीचर्स असणार आहेत.

कॅमेरा जेस्चर..
गुगलने अँड्रॉईड एक्सेसिबिलीटी सूटमध्ये एका नव्या कॅमेरा स्विच फीचरवर काम करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे युजरला आपल्या कॅमेऱ्याला स्विचमध्ये बदलण्याची परवानगी देतं, ज्यामुळे फेस जेस्चरचा वापर करुन आपल्या स्मार्टफोनला कंट्रोल करू शकतात. कंपनीच्या प्रोजेक्ट अॅक्टिवेट अॅपचा वापर करुन हे केलं जातं.

TV कंट्रोल
ह्या फीचर द्वारे युजर्सला आपल्या अँड्रॉईड फोनचा वापर करुन आपल्या टीव्हीला कंट्रोल करता येईल. अँड्रॉईड फोनमध्ये रिमोट-कंट्रोल फंक्शन्स समाविष्ट केले असून युजर्स टीव्ही ऑन करू शकतात. तसंच फोनवरुनच आपल्या आवडीचा शो सुरू करू शकतात. हे फीचर पुढील काही आठवड्यांमध्ये 14 देशांमध्ये उपलब्धहोईल.

अँड्रॉइड ऑटो
ह्या द्वारे गुगल असिस्टेंसने पर्सनलाइज्ड रेकमेंडेशन्ससह गाणी, न्यूज, पॉडकास्ट ऐकण्यास मदत करेल. त्याशिवाय अँड्रॉईड ऑटोच्या मदतीने महत्त्वाच्या मीटिंग आणि मेसेज टॉपवर ठेवले जातील.

फोटो व्हिडीओ पासकोड
ह्या द्वारे युजर्स फोट-व्हिडीओ एका पासकोड प्रोटेक्टेड फोल्डरमध्ये टाकू शकतात. इतर फोटोवेळी हे प्रोटेक्टेड फोटो सर्चमध्ये दिसणार नाहीत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button