Amalner

? प्रेरणादायी…लॉकडाऊन ने उद्धवस्त  होणारा संसार सावरला! महिला अन्याय विरोधी समितीचे सत्कार्य

लॉकडाऊन ने उद्धवस्त होणारा संसार सावरला! महिला अन्याय विरोधी समितीचे सत्कार्य

अमळनेर महेंद्र साळुंके

लॉकडावून मुळे बुलढाणा येथील विशाल आर्थिक अडचणीत येऊन स्वतःचे घर सोडून नातलगांकडे आश्रयास गेल्या मुळे त्याचा संसार दुभंगला होता!
दोन कन्या असलेला विशाल व अमळनेर येथील सुचिता (नाव बदलले आहे) यांच्या संसारात मोठे वितुष्ट आले होते. सुचिताचे बहीण व पाहुणे यांनी महिला अन्याय विरोधी समितीचे धनंजय सोनार यांची मदत घेतली. श्री.सोनार यांनी यांचे दोन्ही कुटुंबाचे शास्त्रीय समुपदेशन केले.
यशस्वी मार्ग निघून सुचिता ही विशाल याचे सोबत बुलढाणा येथे नांदावयास रवाना झाली!
लॉकडाऊन मुळे निर्माण झाल्या आर्थिक अडचणी, नातेवाईक यांचा अकारण हस्तक्षेप, व परस्पर सामंजस्याचा अभाव यामुळे एक संसार दुभंगला होता. पती विशाल व त्यांचे मामा यांचे कडून सदवर्तनाची व आपसातील तणाव मिटविण्या बाबत वचनचिट्ठी लिहून घेत दुभंगलेल्या संसाराची नवीन पायाभरणी झाली. अमळनेरच्या महिला अन्याय विरोधी समितीच्या पुढाकाराने एक परिवार सावरला आहे. या बद्दल दोन्ही परिवार व उपस्थितांनी धनंजय सोनार यांचे आभार व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button