Amalner

अमळनेर: डि आर कन्या शाळेत उमलती कळी ह्या विषयावर चर्चासत्र संपन्न..

अमळनेर: डि आर कन्या शाळेत उमलती कळी ह्या विषयावर चर्चासत्र संपन्न..

अमळनेर डी आर कन्या शाळेत “उमलती कळी” या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगे महाराज प्रबोधन परिषद व नीमा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ह्या कार्यक्रमाची सुरूवात जिजाऊ वंदनेने करण्यात आली.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून निमा संघटनेच्या जेष्ठ सदस्या डॉ. अंजली चव्हाण आणि डॉ. लिना चौधरी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका जयश्री सोनवणे होत्या. यावेळी डॉ. लीना चौधरी यांनी विद्यार्थिनींना हार्मोन्सच्या बदलामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्याकगी माहिती दिली तर वैशाली शेवाळे यांनी यामुळेच होणारे मानसिक असमतोल व होणारे बदल याबाबत माहिती दिली. कार्यक्रम संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेच्या प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. वैशाली पाटील याच्या मार्गदर्शनाने घेण्यात आला. सूत्रसंचालन विद्या पाटील यांनी केले. वर्षा पाटील यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button