Ambad

चोरीची महिंद्रा कार आणि 11 शेळ्या शहागड येथे सोडून चोरटे पसार गोंदी पोलीसांनी केला 16 किलोमीटर चोरट्याचा पाठलाग

चोरीची महिंद्रा कार आणि 11 शेळ्या शहागड येथे सोडून चोरटे पसार गोंदी पोलीसांनी केला 16 किलोमीटर चोरट्याचा पाठलाग

अंबड : तालुक्यातील आपेगाव ता.अबंड येथील राज्य महामार्ग येथे गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी रात्री दीड वाजेच्या सुमारास अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबविल्याने महिंद्रा कार एम.एच. 48 एफ 3323 न थांबतातच भरधाव वेगाने निघाली होती.या कारचा पोलीस निरीक्षक बल्लाळ, चालक श गजानन अवचर, पो.का संदीप राठोड, शिरसाट यांनी 16 किलोमीटर पाठलाग केला. ही गाडी शहागड येथील संत एकनाथ चौक येथील डिवायडरला कार धडकली.यातील चार चोरटे कार व कारमधील 11 शेळ्या सोडून अंधाराचा फायदा घेऊन रात्री अडीच वाजेच्या सुमारास चोरटे फरार झाले.घटनेची माहिती शेजारील सर्व जिल्ह्यांना देण्यात आली. तसेच व्हाट्सएपवरून संदेश पाठवण्यात आले.बिडकीन पो स्टे हद्दीत अक्षय रमेश जावदे, वय 26 वर्ष, रा इमामपूर वाडी, ता. पैठण येथील शेतवस्ती वरून गोट फार्म वरून या शेळ्या चोरण्यात आल्या होत्या हे कळले.पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उप विभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांचे मार्गदर्शनखाली पो नि. शीतलकुमार बल्लाळ व कर्मचारी यांनी कामगिरी केली आहे.

Leave a Reply

Back to top button