Pandharpur

सोलापूर जिल्ह्यातील सुशिक्षित युवक,युवती व महिलांसाठी आरोग्य क्षेत्रात काम करण्याची सुवर्णसंधी,

सोलापूर जिल्ह्यातील सुशिक्षित युवक,युवती व महिलांसाठी आरोग्य क्षेत्रात काम करण्याची सुवर्णसंधी,

मोफत प्रशिक्षण व प्रशिक्षणानंतर मोठे मानधनही मिळणार

मोफत …मोफत….मोफत….मोफत

प्रतिनिधी
रफिक आत्तार

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर,मंगळवेढा,सांगोला,करमाळा येथील सर्व सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांसाठी नर्सिंग प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम यांच्या अंतर्गत संयुक्त विद्यमाने 18ते45 वयोगटातील तरुण,युवक,महिलावर्गासाठी मोफत शासकीय नर्सिंग प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत.तरी येत्या दि.27 ते 28ऑक्टोबर च्या आत यामध्ये जास्तीत जास्त तरुण,तरुणींनी सहभाग घेऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. यासाठी शिक्षण मर्यादा केवळ इ.10 वि.पास आहे.नोंदणी क्रमांक 9270486390.इच्छुकांनी कृपया लवकरात लवकर संपर्क साधावा कारण मर्यादित प्रवेश राहणार आहेत.सर्व चारही जिल्ह्यात प्रशिक्षणाचे ठिकाण वेगवेगळे राहणार असून यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना सरकरकडून 11हजार रुपये दिले जाणार आहेत.
पंढरपूर येथील प्रशिक्षणाचे ठिकाण-नवजीवन हॉस्पिटल म्हणजेच डॉ शितल के शहा यांच्या हॉस्पिटल मध्ये आणि गँलॅक्सि हॉस्पिटल पंढरपूर.मंगळवेढा येथील प्रशिक्षणाचे ठिकाण- महिला हॉस्पिटल मंगळवेढा सांगोला येथील प्रशिक्षणाचे ठिकाण- सद्गुरू हॉस्पिटल सांगोला करमाळा येथील प्रशिक्षणाचे ठिकाण-समर्थ बाल रुग्णालय करमाळा
या प्रशिक्षणचा कालावधी–4 महिने राहणार यामध्ये
1 महिना ट्रेनिंग,3 महिने ऑन जॉब ट्रेनिंग करणे सक्तीचे आहे .त्यानंतर सरकार कडून 11 हजार रु. प्रत्येक लाभार्थींना मिळतील.यासाठी 1)आधार कार्ड 2) 10वी पास मार्कशीट 3) 2फोटो 4)बँक खात्याची माहिती देणे अनिवार्य आहे.यामुळे या मोफत शासकीय नर्सिंग प्रशिक्षणात सहभाग घेऊन आरोग्य विभागात सेवा करण्याची संधी जास्तीत जास्त तरुण युवक-युवतींनी उपलब्ध करून घ्यावी असे आवाहण करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button