Mumbai

परदेशात जाताय..!थांबा..! पासपोर्टचे नियम बदलले..!जाणून घ्या नवीन नियम..!आणि ह्या पद्धतीने करा प्रक्रिया पूर्ण

परदेशात जाताय..!थांबा..! पासपोर्टचे नियम बदलले..!जाणून घ्या नवीन नियम..!

मुंबई संपूर्ण जगात कोरोनाने गेल्या 2 वर्षात धुमाकूळ घातला. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आता हळूहळू कोरोना संसर्ग कमी होत असल्याने आणि आता संपूर्ण ह्या रोगाविषयी,उपचारविषयी उपलब्ध असल्याने भीती कमी होत आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वीप्रमाणे हळूहळू व्यवस्थित होत आहे.लोक बाहेर पडत आहेत. फिरायला जात आहेत. अजूनही काही देशांनी प्रवेश खुला केला नसला तरी काही देशांनी अटी शर्ती घालत पर्यटकांसाठी त्यांच्या आंतरराष्ट्रीय सीमा खुल्या केल्या आहेत. तर अनेक देशांनी कोविड लस प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे.

तसेच पासपोर्ट चे नियम देखील बदलले आहेत.पासपोर्ट ला कोविड प्रमाणपत्र अनिवार्य केले असून ते पासपोर्टला ताबडतोब लिंक करावयाचे आहे.जेणेकरून परदेश जाण्यासाठी अडचण येणार नाही. जर तुम्ही कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, तर तुम्ही काही स्टेप्स पाळून तुमच्या पासपोर्टशी कोरोना लसीचे प्रमाणपत्र खालील प्रक्रिया पूर्ण करून जोडता येईल

अशी आहे प्रक्रिया

प्रथम Cowin च्या अधिकृत वेबसाइट www.cowin.in ला ओपन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर होम पेजवरील सपोर्ट पर्यायावर क्लिक करून येथे तीन पर्याय मिळतील.त्यात certificate corrections वर क्लिक केल्यानंतर
लसीकरणाची स्थिती दिसेल.त्यात Raise an issue पर्यायावर क्लिक केल्यानंतर पासपोर्ट तपशील जोडण्यासाठी क्लिक करायचे आहे.त्यात लसीकरणाचा तपशील नाव आणि पासपोर्ट क्रमांक भरून सबमिट करायचे आहे. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक मेसेज येईल यानंतर लस प्रमाणपत्र कोविन अॅपवरून डाउनलोड करता येईल यात पासपोर्ट तपशील अपडेट केला जाईल.

कोविन प्रमाणपत्र

या प्रक्रियेनंतर कोविन प्रमाणपत्र आता आंतरराष्ट्रीय स्वरूपावर आधारित असेल. हे स्वरूप जागतिक प्रवाशांसाठी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) निर्धारित केलेल्या मानकांवर आधारित असेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button