Indapur

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील शेळी/मेंढी बाजार सुरू

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील शेळी/मेंढी बाजार सुरू

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे:इंदापुर कृषी उत्पन्न बाजार समिती , अंतर्गत येणारे सर्व शेळी/मेंढी बाजार कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्या आदेशान्वये बंद होते. या परिसरातील व्यापाऱ्यांच्या बाजार सुरू करण्याच्या मागणी नंतर येथील बाजार (ता.२३) रविवार रोजी सहा महिन्यानंतर सुरु झाला.
भिगवण येथील शेळी/मेंढी बाजारात पुणे अहमदनगर सोलापूर सातारा जिल्ह्यातील व्यापारी व शेतकरी, मेंढपाळ आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन खरेदी – विक्री साठी आणतात . अनेक शेतकरी,मेंढपाळ ,व्यापारी यांचा उदरनिर्वाह यांवरच अवलंबून आहे , सहा महिन्यापासून बाजार बंद असल्याने अनेकांची गैरसोय झाली होती .

रविवार (दि.२३) रोजी लॉक डाऊन नंतर प्रथमच शेळी, मेंढी खरेदी विक्रीचा बाजार सुरू झाला हळूहळू लवकरच सर्व व्यवहार पूर्वपदावर येतील . तसेच बाजार समिती ने व्यापाऱ्यांची, बाजार सुरू करण्याची मागणी पूर्ण केल्याबद्दल शेतकरी व व्यापारी यांनी आभार पंरतु इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील बाजार बाजार समितीने सुरु करावी अशी मागणी शेतकरी व व्यापारी यांनी केली आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button