Pandharpur

गोवा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२२ च्या पार्श्वभूमीवर बैठक..

गोवा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२२ च्या पार्श्वभूमीवर

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार मा. समाधान दादा आवताडे यांनी भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कळंगुट विधानसभा मतदारसंघामध्ये कॉर्नर सभा घेतल्या.देशाचे गौरवशाली पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या शक्तिशाली दूरदृष्टी नेतृत्वातून गोवा राज्याने देशात वेगळी उंची गाठली आहे. धोरणात्मक विकासाचे प्रगतशील तोरण नव्याने बांधण्यासाठी गोवा राज्यातील जनता पुन्हा सज्ज झाली आहे. विधायक कार्य आणि सर्वसामान्य जनता यांना केंद्रबिंदू मानून वाटचाल करणाऱ्या भाजपा सारख्या सर्वसमावेशक राष्ट्रीय पक्षास मतदार बंधु – भगिनींचा वाढता उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा हे विजयाची नांदी असल्याचा विश्वासही असे आ. समाधान दादा आवताडे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी भाजपा कलंगुट विधानसभा अध्यक्ष मा. यशवंत कांडोलकर, गोवा राज्य कार्यकारी संचालक मा. गुमंडा शिवोडका, भाजपा कलंगुट विधानसभा सचिव मा. ज्ञानेश्वर माटकर, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा मा. गीता परब आदी मान्यवर व मतदार उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button