Yawal

न्हावी तालुका यावल येथील भारत विद्यालयाच्या बारावीच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कोळी समाजाच्या विद्यार्थ्यांचा गौरव ‌.

न्हावी तालुका यावल येथील भारत विद्यालयाच्या बारावीच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कोळी समाजाच्या विद्यार्थ्यांचा गौरव ‌.

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

यावल : न्हावी तालुका यावल येथील कोळी समाज समन्वय समिती यावल तालुका अध्यक्ष डॉक्टर स्वप्निल मोहन साळुंखे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रथम आद्यकवी महर्षी वाल्मीक रुषी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सदर कार्यक्रमास सुरुवात केली बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कोळी समाजाच्या
दहा विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी डॉक्टर मोहन साळुंखे हे होते त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या व डॉक्टर मोहन साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण कोळी यांनी केले व आभार प्रदर्शन श्री अशोक साळुंके यांनी मानले या कार्यक्रमात ज्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले त्यांची नावे खालील प्रमाणे हेमांगी सुरेश कोळी अश्विनी कैलास कोळी गायत्री भाऊराव कोळी खीलेश संतोष कोळी मुकेश नामदेव कोळी गौरव सुरेश कोळी कपिल मधुकर इंगळे हर्षद निंबाळकर यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले नंतर डॉक्टर स्वप्नील साळुंके यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमास सुनील कोळी अरुण कोळी सुपडू साळुंके
मुरलीधर साळुंखे तुषार साळुंके विनोद कोळी भाऊराव कोडी भागवत कोळी व कोळी बंधू-भगिनी हजर होते अशाप्रकारे सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button