Nanded

अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने २०१९ सालच्या धर्तीवर वेगळा विशेष शासनआदेश जारी करून शेतकऱ्यांना आधार द्या….मनसेची मागणी

अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने २०१९ सालच्या धर्तीवर वेगळा विशेष शासनआदेश जारी करून शेतकऱ्यांना आधार द्या….मनसेची मागणी

गोविंद सुर्यवंशी नांदेड

नांदेड : या वर्षी भोकर तालुक्यासह जिल्हयात पावसाने थैमान घातल्या मुळे प्रचंड पिक हानी झाली आहे.बहुतांशी ठिकाणी सरासरी पेक्षा कितीतरी अधिक पाऊस झाला आहे यामुळे अनेक नदी,नाले व ओहळाना आलेल्या पुरामुळे खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी पशुधन वाहून गेली.घरांची पडझड झाली.तालुक्यातील शेतकर्यांचा संसार उघड्यावर आला.यापुरामुळे अनेक ठिकाणी शेतकर्याचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे.
प्रशासनाने पंचनाम्याचे काम हाती घेतले आहे परंतु त्यातील फोल पणा आता पुढे येऊ लागला आहे.शेतकर्यांना आता पुन्हा उभे करायचे असेल त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी लागणार आहे पिक विमा कंपनी कडून सुधा शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर अडचण येत असून पिकांची नुकसान झाल्याची माहिती online भरत असताना मोठ्या अडचणी येत आहेत वेबसाईट सुद्धा बंदच राहत आहे.ऑफलाईन अर्ज सुधा मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. ४८९० हेक्टर हुन अधिक क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे.
दोन वर्षापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर,पुणे,सांगली,सातारा या जिल्हात अतिवृष्टी होऊन जनजीवन विस्कळीत होऊन ठप्प होते.या आतीवृष्टीची गंभीर दखल घेत २९ ऑगस्ट २०१९ रोजी या चार जिल्हासाठी शासनाने वेगळा विशेष शासननिर्णय जारी केला होता.भोकर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात तशीच परिस्थिती उद्भवत असल्याने उपरोक्त प्रमाणे शासनाने विशेष बाब म्हणून स्वतंत्र शासननिर्णय जारी करून भोकर तालुक्यातील कोलमडलेल्या शेतकर्यांना त्वरित मदतीचा हात द्यावा.अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका भोकरच्या वतीने तीव्र मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल व होणार्या परिणामांस प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील याची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी.असे निवेदन मा.उपविभागीय अधिकारी कार्यालय,भोकर यांच्या मार्फत दादाजी भुसे साहेब,
कृषिमंत्री(महाराष्ट्र राज्य मंत्रालय,मुंबई),एकनाथजी डवले साहेब,(कृषिसचिव,महाराष्ट्र राज्य मंत्रालय,मुंबई) यांना निवेदन दिले आहे.
त्यात वरील सर्व विषय नमुद केले आहे कृषिमंत्री भोकर तालुक्यातील शेतकर्यासाठी काय मदत करतील ह्या कडे जनतेचे लक्ष वेधून आहे.निवेदन देताना यावेळी माधव मेकेवाड(भोकर विधानसभा अध्यक्ष),साईप्रसाद जटालवार(तालुका अध्यक्ष,भोकर),सौ.पूजा बनसोडे(महिला सेना अध्यक्ष) सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button